पत्नीची आत्महत्या, पतीवर गुन्हा दाखल

0
1618

घातपाताचा संशय

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर पतीचा वाढदिवस असल्याने पत्नीने पतीला ओवाळायला ताट घेतले मात्र मला तिच्याकडे ओवाळायला जायचे आहे. यावरून दोघांमध्ये भांडणे झाली. रोजचा वाद, पतीचे असले वागणे आणि मारहाण यामुळे वैतागलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून घातपात आहे असा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. ही धक्कादायक घटना दि. 24 मार्च 2024 रोजी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड, सुकेवाडी येथे पहाटेच्या सुमारास घडली.
रिना राजेंद्र हाडवळे (रा. लिंगदेव, ता. अकोले, जि. अ.नगर) हिचा मृत्यू झाला आहे. तर याप्रकरणी राजेंद्र ज्ञानदेव हाडवळे याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप असलेला पती राजेंद्र हाडवळे हा बीएसएफमध्ये भर्ती झालेला होता. मात्र दारूचे व्यसन लागल्यामुळे तो नोकरी सोडून घरी आला होता. दारूच्या व्यसनापायी त्याचे पत्नीशी कायम वाद होत होते. तो तिला मारहाण करुन त्रास देत होता. त्यामुळे रिना माहेरी निघून गेली होती. कालांतराने दोघांमध्ये समझोता झाला आणि त्यानंतर राजेंद्र हा टोलनाक्यावर गनमॅन म्हणून कामाला लागला. मात्र, दारुचे व्यसन काही सुटले नव्हते. त्यामुळे, कधी वाद तरी कधी घरात राडा सुरूच होता. या सगळ्या गोष्टीला रिना वैतागून गेली होती. मात्र, घरात एक मुलगी असल्यामुळे तिने फार मोठा संयम ठेवला होता. मात्र त्याचे दारू व बाहेरख्याली वर्तन सुरूच राहिले. त्यातून हा वाद विकोपाला गेला. त्यातून अखेर रिना हिने स्वत:ला संपविले. मात्र ही आत्महत्या नसून घातपात आहे यावरून पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here