संगमनेरात वाहन चालकांचे आंदोलन

0
1954

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – केंद्र सरकारने हिट अ‍ॅण्ड रन या कायद्या अंतर्गत 10 वर्षांचा तुरूंगवास व 7 लाखांचा दंड याविरोधात संगमनेर तालुका मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन व चालक, मालक संघटनेच्या वतीने स्टेरिंग छोडो आंदोलन करत शहरातील दिल्ली नाका येथे चक्काजाम केला.
केंद्र सरकारने केलेला हा कायदा रद्द करावा. जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत चालक, मालक आपली वाहने रस्त्यावर उतरवणार नाही असा इशारा यावेळी चालक, मालक यांनी दिला. वाहन चालवितांना रस्त्यावर होणारे अपघात कोणीही जाणीवपूर्वक करत नाही. तसेच अपघातानंतर वाहन चालक जीवाच्या भितीपोटी पळून जातो. प्रत्येक अपघातामागे मोठ्या वाहनचालकाचीच चुक नसते. मात्र तरीही त्याला दोषी धरले जाते. आणि या कायद्यात केलेली तरतूद अन्यायकारक व चालकांच्या अवाक्या बाहेरचा दंड असल्याने हे आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here