विखे – थोरात यांच्यात रंगला कलगीतुरा

पालक मंत्री रहा, मालक बनू नका – आ. थोरात

पालकत्व कसे निभवयाचे आम्हाला चांगले माहित – ना. विखे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर दहशत करण्यापेक्षा दुष्काळाकडे गांभीर्याने बघा, दहशत करून किंवा धमक्या देऊन संगमनेरचा विकास तुम्ही रोखू शकत नाही. थोडे लक्ष राहाता तालुक्यातही घाला. तेथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून आपली अधिक आवश्यकता आहे. पालकमंत्री म्हणून रहा, मालक असल्यासारखे वागू नका, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना दिला.
पालकमंत्री पालकाची भूमिका विसरून मालकाच्या भूमिकेत आलेले दिसतात. संगमनेरमध्ये येऊन अधिकारी कर्मचार्‍यांसह विकास कामे पूर्णत्वाकडे नेणार्‍या कंत्राटदारांना धमक्या दिल्या जातात. त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरचा विकास त्यांना बघवत नसल्याने त्यांचा राग मी समजू शकतो. धाक दपटशाह आणि दादागिरी करूनही संगमनेरची जनता वाकायला तयार नाही, त्यामुळे त्यांच्यात वैफल्यग्रस्त भावना तयार झाली आहे. दुसरीकडे तलाठी भरती, वाळू धोरण याचा पुरता बोजवारा उडाला आहे. लम्पी आजार थांबलेला नाही तो उलट वाढतो आहे. त्यामुळे आपला राग काढण्यासाठी ते संगमनेरमध्ये येतात. मात्र येथे येऊन दहशतीची भाषा करणार असाल तर येथील जनता सहन करणार नाही. त्यामुळे पालक मंत्र्यांचीच भुमिका बजवावी. असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री विखेंना लगावला.


युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. अनेक वर्षे सता असूनही ज्यांना तालुक्याला पाणी देता आले नाही त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. पालकत्व कसे निभावयाचे ते आम्हांला चांगले कळते. तुम्हीच आमच्याकडून काही शिका, अशी खोचक टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.


आ. बाळासाहेब थोरात यांनी बोलविलेल्या आढावा बैठकीला प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित नव्हते. यावेळी आ. थोरात यांनी महसूल मंत्र्यांवर टिका केली होती. या टिकेला उत्तर देतांना ना. विखे यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका, आम्हा काय करायचे ते चांगले माहित आहे. उलट तुम्हीच आमच्याकडून काहीतरी शिका असे म्हणत पलटवार केला. संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त ’मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे उपस्थित होते

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख