जलनायक आ. थोरात यांच्या हस्ते निळवंडे कालव्याचे पाणी पूजन



निळवंडेचे पाणी येणे हा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण- आमदार थोरात

भजन, अभंग आणि आकर्षक रोषणाईसह मोठ्या जल्लोषात पाणी पूजन

युवावार्ता ( प्रतिनिधी)
संगमनेर –

उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन धरणासाठी व कालव्यासाठी सातत्याने काम करणारे महाराष्ट्राचे जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले असून हा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन आमदार थोरात यांनी केले आहे.पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यालगत संगमनेर तालुक्यात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी या धरणाचे व कालव्यांचे जनक आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ ,रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे ,संतोष हासे , विश्वासराव मुर्तडक, उत्तमराव घोरपडे,आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळगाव कोझीरा बोगद्यालगत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने कालव्यांच्या दुतर्फा मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती . यावेळी लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची पारंपारिक वाद्यात ग्रामस्थांनी मोठी मिरवणूक काढली. आकर्षक आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर, पारंपारिक वाद्य, सुवासिनीचे औक्षण ,, यांसह तरुण नागरिक व आबालवृद्धांसह सर्वांचा जल्लोष हे या आनंददायी सोहळ्याची वैशिष्ट्य ठरले. अत्यंत संस्मरणीय ठरलेल्या या रम्य सायंकाळी आमदार थोरात यांच्या संकल्पनेतून कालव्याच्या किनारी कार्यकर्त्यांनी भजन व अभंग गाऊन  वातावरण मंत्रमुग्ध केले .यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की ,निळवंडे धरण व कालवे व्हावे हे आपले स्वप्न होते. 1985 पासून या कामाचा पाठपुरावा  सुरू केला.1992 ला सुरुवात झाली. परंतु कामाला 1999 पासून गती मिळाली. अनेक अडचणीवर मात करून धरण पूर्ण केले. कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. इतक्या दिवसाच्या अथक परिश्रमानंतर तालुक्यात आलेले पाणी हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असून यामुळे दुष्काळी भागातील जनतेच्या जीवनात मोठे परिवर्तन होणार आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेत  मोठा बदल होणार आहे.

आपण कधीही श्रेयासाठी काम केले नाही. या यशामध्ये अनेकांचे योगदान आहे. अनेकांनी त्याग केलेला आहे. सर्वांच्या कामातून व त्यागातून आजचा हा सुवर्ण दिवस उगवला आहे. डाव्या कालव्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते .धरणात पाणी शिल्लक असताना यातून चाचणी व्हावी यासाठी आपण पाठपुरावा केला. उजव्या कालव्याचे कामही तातडीने व्हावे हाच आपला कायम आग्रह आहे.अनेक जण श्रेयासाठी झटत आहेत. मात्र आपण कामाला महत्त्व देतो धरण व कालव्यांची कामे कोणी केली हे ही सर्व जनतेला माहित असल्याचेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.तर आमदार डॉ तांबे म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांचे खरे श्रेय हे आमदार बाळासाहेब थोरात यांचेच असून त्यांनी जीवनाचे ध्येय मानून धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. दुष्काळी माणूस व गरिबांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी हे काम केले असून ही स्वप्नपूर्ती होत असल्याने हा तालुक्याच्या भाग्याचा दिवस ठरत आहे .यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा , जवळे कडलग व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नागरिक, महिला, युवक, यांचे सह निळवंडे पाट पाणी कृती समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

जलदूताच्या हस्ते जलपूजनाने आनंदोत्सव
ज्यांनी निळवंडे धरणासह विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावला. त्यानंतर डावा-उजव्या कालव्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील हजारो एकर क्षेत्र ओलीताखाली आणण्याचे स्वप्न पाहून ते पुर्णत्वास नेले. निळवंडे प्रकल्पात सर्वाधिक योगदान आ. बाळासाहेब थोरात या जलदूताने दिले. असे असतांना नुकत्याच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडलेल्या निळवंडे कालवा चाचणी उद्घाटनाला आ. थोरात यांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. त्यामुळे या लाभधारक क्षेत्रात तीव्र नारजी व्यक्त होत होती. मात्र काल या जलपूजन सोहळ्यासाठी अनेक शेतकरी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून मोठा आनंदोत्सव त्यांनी साजर केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख