सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना पुण्यतिथी निमित्त 14 मार्च रोजी अभिवादन

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात


आमदार थोरात, मा. आ. डॉ. तांबे यांची उपस्थिती

युवावर्ता (प्रतिनिधी)

संगमनेर -सहकारासाठी दीपस्तंभ असलेल्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी सकाळी 9 वा. अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

स्वातंत्र्यसंग्रामानंतर सहकाराच्या माध्यमातून गोरगरीब माणसांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करताना स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर, व आधुनिकता ही तत्वे रुजवली. याच रचनात्मक वाटचालीवर विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूह काम करत आहेत. मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी 13 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना पुष्पांजली व आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, टीडीएफचे राज्य समन्वयक हिरालाल पगडाल व कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांचे मनोगतही होणार आहे.

या कार्यक्रमासाठी आमदार सत्यजित तांबे,शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे ,सौ.दुर्गाताई तांबे, सौ.कांचनताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव पा. खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे,राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ ,सौ.सुनंदाताई जोर्वेकर, सौ.अर्चनाताई बालोडे, सौ.निर्मलाताई गुंजाळ, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे ,सिताराम राऊत, नवनाथ आरगडे, निखिल पापडेजा, प्रा.बाबा खरात, प्राचार्य केशवराव जाधव, सुरेश झावरे, जावेद शेख यांचे सर्व जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या अभिवादन कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमृत उद्योग समूह, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख