विजय नागरी पतसंस्थेला ३ कोटी १ लाख रुपयांचा नफा

0
1341

नाशिक शाखेच्या ठेवी ३ महिन्यात ३ कोटी २५ लाख झाल्या असून नाशिककरांनी हा संस्थेवर टाकलेला विश्वास आहे – विशाल जाखडी


नाशिक विभाग कार्यक्षेत्र असणाऱ्या विजय पतसंस्थेला सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षात ३ कोटी १ लाख रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉ.पराग प्रकाश सराफ यांनी दिली , सर्व प्रकारच्या आवश्यक व NPA ची तरतूद केल्या नंतर सदर नफा झाल्याचे सांगितले आहे गेली ३२ वर्षे सर्वसामान्य ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या पतसंस्थेने सन २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षामध्ये प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला असून संस्थेच्या ३१ मार्च अखेर १२१ कोटी २८ लाखाच्या ठेवी झाल्या आहेत , ९७ कोटी ११ लाखाचे कर्ज वाटप संस्थेने केले असून विविध स्तरातील गरजूंची कर्जाची गरज भागवली आहे , ५४ कोटी ३२ लाखाची गुंतवणूक संस्थेने केली असून २८ कोटी ९१ लाख इतका भक्कम स्वनिधी संस्थेचा आहे भाग भांडवला पोटी २ कोटी ७ लाख इतके भाग भांडवल संस्थेकडे असून २१८ कोटी ३९ लाख रुपयांचा एकत्रित व्यवसाय संस्थेने केला आहे.

संस्थेने नुकत्याच सुरु केलेल्या नाशिक शाखेच्या ठेवी ३ महिन्यात ३ कोटी २५ लाख झाल्या असून नाशिककरांनी संस्थेवर टाकलेला विश्वास आहे संस्थेचा प्रती कर्मचारी व्यवसाय ६ कोटी ६१ लाख असून NPA चे प्रमाण शून्य आहे सहकार खात्याच्या नियमा नुसार ६७.८४ टक्के इतका सी.डी.रेशो आहे . अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री विशाल भालचंद्र जाखडी यांनी दिली. या प्रसंगी संस्थेचे संचालक डॉ . आशुतोष नारायण माळी श्री . प्रवीण माधवराव बेलापूरकर श्री. संदीप दत्तात्रय मुळे सौ मैथिली मिलिंद कुलकर्णी डॉ . केदार विलास सराफ श्री . विश्वजित वसंतराव कुलकर्णी श्री . प्रवीण सोमनाथ रत्नपारखी डॉ उदय बाळकृष्ण जोशी श्री . बाळकृष्ण महादेव महाजन डॉ.. वैशाली अजित कुलकर्णी प्रज्ञा रविंद्र डांगे श्री रामनाथ अवडाजी जगताप .श्री भीमाशंकर रावबा चकोर श्री. प्रवीण सखाराम कर्पे श्री . अशोक भास्कर सराफ श्री रवींद्र बळवंत जोशी .श्री विनायक प्रकाश कुलकर्णी श्री.कमलाकर विश्वनाथ भालेकर सर व्यवस्थापक श्री योगेश वासुदेव उपासनी शाखा व्यवस्थापक देवयानी जोशी , शाखा व्यवस्थापक कल्पना कोडूर व कर्मचारी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here