रक्तदात्यांनी व्यक्त केल्या रुग्णालयाप्रती आपल्या शुभेच्छा
वर्धापनदिनानिमित्त शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन केले जठार दाम्पत्याचे अभिनंदन
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – समर्पित भावनेने परिपूर्ण आरोग्य सेवा देणारे येथील (चैतन्य हॉस्पिटल) डॉ. जठार हॉस्पिटलचा 18 वा वर्धापनदिन रक्तदान श्रेष्ठदान या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबीरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून या रुग्णालयाप्रती आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
संगमनेरकरांच्या आरोग्य सेवे बाबतच्या अडचणी दुर करून मेंदू, पोटाचे विकार, किडनीचे आजार, गंभीर अपघात, किचकट शस्त्रक्रिया अशा गंभीर आजारावर उपचार डॉ. जठार यांनी एकाच छताखाली सुरू केले. त्यामुळे आता रुग्णांना नाशिक, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात जावे लागत नसल्याने त्यांचे पैसे आणि वेळ वाचला आहे. हा प्रवास कधीकधी ते जिवावरही बेतत होता. मात्र दूरदृष्टी ठेऊन डॉ. नितीन जठार, डॉ. सौ. उज्वला जठार यांनी 18 वर्षांपुर्वी शहरातील ताजणे मळा येथे अत्याधुनिक पद्धतीने व सर्व सुविधांयुक्त डॉ. जठार हॉस्पिटल उभारले व नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध घेऊन या हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्याने अत्याधुनिक यंत्रणा उभारल्या. काल सोमवारी या रूग्णालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. जठार दाम्पत्य व रूग्णालयास शुभेच्छा दिल्या. शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन या दाम्पत्याचे अभिनंदन केले.
या रूग्णालयात अती सुसज्ज, अती दशता विभाग, मधुमेह व हृदयरोग उपचार, विषबाधा उपचार, मेंदू शस्त्रक्रिया, किडणी विकार, बालरोग चिकित्सा, प्लास्टिक सर्जरी, पोटाचे विकार यासह अनेक आजारांवर खात्रीशिर व परिणामकारक उपचार केले जातात.