
विक्रमभाऊ नवले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अकोले तालुक्यातील युवा नेते, भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, अभिनव शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष, बुवासाहेब नवले मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन मा. विक्रम मधुकर नवले यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या विक्रम भाऊंना मनःपूर्वक शुभेच्छा.
अकोले तालुक्यातील सर्व परिचित व सर्वांचे आवडते ज्येष्ठ राजकीय नेते मा. मधुकरराव नवले व सुमनताई नवले यांचे सुपुत्र. मा. मधुकरराव नवले जे सर्वांना भाऊ म्हणून परिचित आहेत, एक सदाचार संपन्न, सद्विवेकी, समजाभिमुख, आर्थिक, सामाजिक, राजकीय शैक्षणिक या सर्व बाबींचे वैचारिक विद्यापीठच जणू! अशा कुटुंबात मा. विक्रमभाऊ नवले यांचा जन्म झाला. लहान बाळाने आपल्या सभोवताली असलेल्या भल्या मोठ्या परिसराचे हळूहळू अवलोकन करावे व विचारपूर्वक पुढे पाऊल टाकावे तसेच काहीसे विक्रम भाऊंच्या बाबतीत झाले.

लहानपणापासूनचमा. मधुभाऊंचा आदर्श, आचार, विचार, शिस्त यामध्ये विक्रमभाऊ लहानचे मोठे झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. त्यांचा वैचारिक ठेवा तयार झाला. आपल्या वडिलांच्या प्रति अपार प्रेम, आदर, स्नेह, श्रद्धा, विश्वास. त्यांच्यापुढे एक शब्दही विक्रम भाऊंच्या तोंडातून फुटणार नाही इतकी आदरयुक्त भीती. मा. मधुभाऊंच्या वटवृक्षाच्या सावलीत, सतत माणसांचा राबता असलेल्या कुटुंबात स्वतः सामावून घेणं, मा. भाऊंच्या कर्तृत्वाचा वसा पुढे घेऊन चालणं हे इतकं सोपं नाही. असे म्हणतात की डवरलेल्या, फुललेल्या मोठ्या झाडाच्या सावलीत छोटी झुडपे वाढत नाहीत. परंतु विक्रम भाऊंनी मात्र मा. भाऊंच्या डवरलेल्या फुललेल्या वटवृक्षाच्या सावलीतही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला व करत आहेत. एक उदयोन्मुख युवा नेता म्हणून स्वतःला समाजासमोर त्यांनी प्रस्थापित केले आहे. आजच्या सैरभैर झालेल्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत संभ्रमावस्थेत असलेल्या युवक वर्गासमोर तालुक्यातील युवकांसाठी विक्रमभाऊ एक आशास्थान आहे. तालुक्यातील युवावर्गाचे महत्त्वाचे प्रश्न हाताळणारा, त्यांना मदतीचा हात देणारा, त्यांना मार्गदर्शन करणारा एक आशेचा किरण म्हणून विक्रम भाऊ यांच्याकडे पाहिले जाते. आदरणीय मधुभाऊंच्या मार्गदर्शनाखाली बुवासाहेब नवले मल्टीस्टेट बँकेचे कामकाज विक्रम भाऊ चेअरमन म्हणून सक्षमपणे सांभाळत आहेत. अभिनव शिक्षण संस्थेचे खजिनदार म्हणूनही अनेक अडचणींतून मार्ग काढत ते मार्गक्रमण करत आहेत. भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी, समाजाभिमुखता, संघटन कौशल्य, सेवाभाव, काम करण्याची जिद्द व धडाडी त्यांना स्वस्त बसू देत नाही. त्यांच्या पुढील वाटचालीत अनेक समाजाभिमुख प्रोजेक्टस् प्रस्तावित आहेत. या सर्व प्रोजेक्ट्सवर त्यांचे काम सध्या सुरू आहे. त्यांच्या या विक्रम पर्वाच्याअरंभास व वाटचालीस त्यांना कोटी कोटी शुभेच्छा.
ईश्वर त्वां च सदा रक्षदु,
पुण्यकर्मणा कीर्तिमार्जय.
जीवनंम तव भवतु सार्थकं
इति सर्वदा मुदम प्रार्थयामहे
जन्मदिवसस्य कोटिशः शुभकामना!





















