शिवसेना महिला शहर आघाडी प्रमुख वैशाली तारे यांच्यासहित तीन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

0
973

काम करताना आम्हाला विचारात न घेतल्याचा केला आरोप

संगमनेर (प्रतिनिधी) – आमदार अमोल खताळ यांची साथ शिवसेना महिला आघाडीच्या काही उमेदवारांनीही सोडल्याचेही वृत्त हाती येत आहे. शिवसेना शहर महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली अशोक तारे यांनी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख यांनी आपला राजीनामा पत्राद्वारे पाठविला आहे. सोबत मनिषा अंबादास पंधारे, वंदना बाळु भुसे, ज्योती सागर पंधारे यांनी राजीनामा दिला आहे. वैशाली अशोक तारे यांनी सांगितले की, मी शिवसेना महिला शहर आघाडीची शहरप्रमुख म्हणून १७ नोव्हेंबर २०२१ पासून काम बघते आहे.आमदार खताळ यांच्या विजयासाठी आम्ही संपूर्ण ताकद पणाला लावली. पंरतू त्यांना आता आमची जाणीव राहिली नाही. त्यांची पत्नीच आता सर्व कामकाज बघते आहे. आमदार अमोल खताळ आम्हाला विचारत सुध्दा नाही. आमदार अमोल खताळ यांनी आत्तापर्यंत केले ते पूरे झाले आणि यापुढे आम्ही त्यांच्यासाठी काम करणार नाही. याऊलट त्यांचा सर्व पॅनेल पडावा अशीच मी अपेक्षा करते असेही वैशाली तारे यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले.

युती सरकारचे जनहिताचे निर्णय व त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्याचे समाजहिताचे काम करण्याासाठी मी संगमनेर शहर महिलाप्रमुख पद स्विकारलेे होते. तथापि पक्षाचे आडमुठे धोरण व निर्णय जनहिताच्या बांधिलकिपासून दुर होत आहे. 17 नोव्हेंबर 2021 पासुन मी या पदावर कार्यरत आहे. हे वेळोवेळी लक्षात आल्यामुळे या पदावर राहुन जनसेवा करणे अशक्य आहे. मी या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे संगमनेर शहरप्रमुख (महिला आघाडी) म्हणून राजीनामा देत आहे. लायकी नसताना ज्यांना अधिक मिळते ती परमेश्वराचीच कृपा असे समजावे लागते. हे पद ही परमेश्वराची कृपा असावी असे मला वाटते. परंतु मी या पदाला प्रयत्न करुनही पात्र झाले नाही. क्षमस्व. माझ्या बरोबर काही महिला पदाधिकारी सामुदायिक राजीनामा देत आहे असे त्यांनी पत्राद्वारे सांगितले.

ऐन निवडणुकीच्या काळात महिला पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील इतर मित्रपक्षांचे प्रश्न बिकट बनले असताना आता शिवसेनेतच अंतर्गत नाराजी नाट्य सुरू झाल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here