बस देतात अपघाताला निमंत्रण,
आगार प्रमुखाचे दुर्लक्ष
नागरीकांनी थांबवली बस
मोठी दुर्घटना टळली
जुनाट व खिळखिळ्या झालेल्या एसटी बसेस पैसे वाचवण्यासाठी किंवा अधिक पैसे कमविण्यासाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालून सुसाट धावत असतात. परंतु या सुसाट धावणाऱ्या बसच्या चाकांचे नट बोल्ट खिळखिळे होऊन रस्त्यात पडत असताना वाहक व चालकांचे मात्र दुर्लक्ष होते. परंतु सुज्ञ व जागृत नागरीकांनी वेळीच धोका ओळखत ही बस थांबवली आणि मोठी दुर्घटना टळली. ही घटना आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील जुन्या पोस्ट ऑफिस जवळ घडली.