
शिवसेना शहरप्रमुख रवींद्र कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा उत्साहात
संगमनेर (प्रतिनिधी)- सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवसेना प्रणित होय हिंदूच ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक सोहळा सकाळी सात वाजता मोठ्या थाटामाटात पार पडला. गेली सतरा वर्षांपासून होय हिंदूच ग्रुपच्या वतीने दुग्धाभिषेक सोहळा करण्यात येतो. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख रवींद्र कानकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोलजी खताळ, माजी आमदार सुधीरजी तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, शिवव्याख्याते पतीत पावन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एस. झेड. देशमुख सर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट साहेब, उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, मर्चंट बँक माजी चेअरमन प्रकाशशेठ राठी, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे, माजी नगरसेवक गजेंद्र अभंग, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, युवा सेनेचे अमित चव्हाण, माजी शहरप्रमुख प्रसाद पवार, शिवसेना विभागप्रमुख अक्षय भागवत, होय हिंदूच ग्रुप उपाध्यक्ष कैलास गायके, मराठा महासंघाचे भाऊसाहेब वराळे, गोविंद खांडरे, ओंकार कानकाटे तसेच ग्रुपचे सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार शिवसेना शहरप्रमुख रवींद्र कानकाटे यांनी मानले.