लायन्सच्यावतीने सफायर बिजनेस एक्स्पोचे आयोजन

0
2213

११ ते १७ जानेवारी नागरिकांना खरेदी, मनोरंजन आणि मेजवानीची संधी

संगमनेर – (प्रतिनिधी)
नवीन उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ग्राहकांना नव नवीन उद्योगाची, वस्तूंची परिपूर्ण माहिती व्हावी व त्यातून त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, उद्योजकांना भरारी मिळावी या उद्देशाने मागील १५ वर्षांपासून चोखंदळ ग्राहकांच्या मागणीनुसार येथील लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीने भव्य सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात येत असते. 

११ जानेवारी पासून सुरू होत असलेल्या या बिझनेस एक्स्पोचे उद्घाटन संमनेर नगरपालिकेच्या मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, एकविरा फाऊंडेशनच्या संस्थापिका जयश्री थोरात, लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनचे राजेश आगरवाल, संगमनेर शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक भगवान मथुरे, लायन्स संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता मालपाणी लॉन्स, लक्ष्मी रोड, संगमनेर येथे संपन्न होणार आहे.

या एक्स्पोमध्ये अवघ्या महाराष्ट्रातून उद्योजक स्टॉल लावणार आहेत. फन, फुड आणि शाॅपिंग अशी या एक्स्पोची थीम असून तरूण, तरूणी, पुरूष, महिला आदींना खरेदीसाठी सुवर्णसंधी मिळणार आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विविध फन गेम्स चा आनंद घेण्यात येणार आहे.  
लायन्स सफायरचे संस्थापक अध्यक्ष प्रकल्प प्रमुख एम.जे.एफ गिरीष मालपाणी, प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिंवसरा, अध्यक्ष व प्रकल्प प्रमुख अतुल अभंग, सेक्रेटरी जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा व त्यांच्या टीमने मोठ्या मेहनतीने संगमनेरकरांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
बिझनेस एक्स्पोला संगमनेरकरांचा उदंड प्रतिसादही मिळत असतो. अबाल वृध्दांसह महिला मोठ्या संख्येने या एक्स्पोमध्ये खरेदीचा, खाण्याचा व खेळण्याचा आनंद लुटत आहे. यावर्षी सफायर बिझनेस एक्स्पो संपूर्ण एक आठवडा चालणार असून ११ ते १७ जानेवारी पर्यंत संगमनेरकरांसाठी खुला राहणार आहे. सकाळी १० ते ४ च्या दरम्यान सर्वांना प्रवेश मोफत असून संध्याकाळी ४ नंतर २० रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. लायन्स क्लबच्या वतीने येथील उदयोन्मुख उद्योजक व व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणार्‍या या उपक्रमात सफायरने व्यापारवृध्दी, व्यवसायाप्रती कटीबध्दता आणि सेवा या त्रिसूत्रीचा उत्तम संयोग साधला आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारा व ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू, सेवांची माहिती देणारा, विविध खाद्यपदार्थांच्या चवींची लज्जत देणारा सफायर बिझनेस एक्स्पो अशी ओळख राज्यात बनली आहे.
तरी या सफायर बिझनेस एक्स्पोचा सर्व संगमनेर, अकोले व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजक गिरीश मालपाणी व त्यांच्या टीमने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here