
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विखे पाटील, शंभुराजे देसाई यांची उपस्थिती
जाणता राजा मैदानावर होणार दुपारी महाविजय मेळावा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आमदार अमोल खताळ यांच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवार 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता जाणता राजा मैदान संगमनेर येथे महाविजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे पर्यटनमंत्री शंभुराजे देसाई, उपस्थित राहणार आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघावर गेली चाळीस वर्षापासूनची एकहाती दूर लोटून एका सर्वसामान्य शेतकर्याचा मुलगा अमोल खताळ यांच्या रूपाने संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण असणार्या आमदार अमोल खताळ व महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे संपर्कमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माजी खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्यासह नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे, माजी खा. सदाशिव लोखंडे, आ. भानुदास मुरकुटे, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे, दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, महिला आघाडी उत्तर जिल्हाप्रमुख सुनिता शेळके व दक्षिण जिल्हा प्रमुख विमल पुंडे आणि जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
आ. खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यालयापासून जाणता राजा मैदानापर्यंत शिवसेना महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या जाहीर सभेसाठी शहर व तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
महायुतीचा हा महाविजयी मेळावा यशस्वी करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले अशून नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे रमेश काळे, विनोद सुर्यवंशी यांनी केले आहे.
