आ. थोरात यांच्या नेतृत्वामुळे जनतेचे जीवनमान समृद्धतेमध्ये देशात पुढे
संगमनेर (प्रतिनिधी) –एखाद्या शहर किंवा तालुक्याच्या विकासात भौतिक सुविधा समवेत तेथील नागरिकांची जीवनमान किती आनंदी आहे. याकरता आरोग्य ,उत्पन्न, जीवनशैली, सामाजिक संबंध, स्वातंत्र्य, या सर्व बाबींचा समावेश असलेल्या हॅपी इंडेक्स मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सततच्या कामातून संगमनेर तालुका हा देशात अव्वल असल्याचे गौरव उद्गार चार्टर्ड अकाउंटंट कैलास सोमानी यांनी काढले आहे. मालपाणी लॉन्स येथे संगमनेर तालुक्यातील व्यापारी व विविध घटकातील समाजाच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ संजय मालपणी यांसह विविध पदाधिकारी होते. यावेळी बोलताना कैलास सोमानी म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मागील अनेक वर्षांच्या सततच्या कामातून तालुका उभा केला आहे. येथील प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण साठी विविध सुविधा देण्यांबरोबर त्या नागरिकाला स्वातंत्र्य ,सामाजिक संबंध, जीवनशैली उंचावण्यासाठी चांगली सुविधा निर्माण करून दिली आहे.
ज्यावेळी एखाद्या देशाची किंवा एखाद्या गावाची प्रगती काढली जाते .त्यामध्ये हॅपिनेस इंडेक्स आनंद निर्देशांक महत्त्वाचा असतो आणि याबाबतीमध्ये संगमनेर तालुका हा देशात अव्वल ठरणार आहे. तालुक्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व बँका असून यामधून सुमारे साडेआठ हजार कोटींच्या ठेवी आहेत 450 च्या पुढे सोनाराची दुकाने आहेत. मोठ-मोठे शोरूम आहेत .शांतता सुव्यवस्था आहे. मोठे शैक्षणिक केंद्र आहे. याचबरोबर मेडिकल हब आहे. पर्यावरणपुरणयुक्त स्वच्छ व सुंदर संगमनेर हे हायटेक बसस्थानकासह विविध वैभवशाली इमारतींमुळे आकर्षक दिसते आहे. सर्व बाबींचा विचार केला तर संगमनेर तालुका हा विकासातून पुढे असल्याने या गावाचा आणि तालुक्याचा प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. आणि हे सर्व करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व आहे. कोणत्याही पक्षातील माणूस असला तरी तालुक्याचे नेतृत्व म्हणून तो आमदार बाळासाहेब थोरात यांच्यात पाठीशी उभा राहतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये संगमनेर तालुक्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी आहे. आणि हे करण्यासाठी तालुक्यातून सर्वांनी मोठे मताधिके आमदार बाळासाहेब थोरात यांना द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा प्रामाणिक आणि सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो यामध्ये तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचे योगदान आहे. की वैभवशाली परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे.आपण कधीही निवडणुकीचे राजकारण केले नाही तालुका हा आपला परिवार असून निवडणूक संपली की दुसऱ्या दिवसापासून लगेच आपण कामाला सुरुवात करतो ती आपली परंपरा आहे. मात्र काही लोक या चांगल्या परंपरेला गालबोट लावण्याचे काम करत असून आपल्या तालुक्यात निर्माण झालेले खबरे व घरभेदी यांचा सर्वांनी बंदोबस्त करावा असे आवाहन त्यांनी केले. तर डॉ तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असून तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण स्वतः उमेदवार आहोत या दृष्टीने काम करावे असे आवाहन केले तर डॉ. संजय मालपाणी म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात हे राजकारण व पक्ष नसून तालुक्याच्या विकासाचा विचार आहे. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.