संगम झोन सोशल २०२५ – सेवाभाव, सन्मान आणि लायनिझमचा एक प्रेरणादायी सोहळा

0
1658

संगमनेर (प्रतिनिधी) : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४–D2 अंतर्गत झोन ५ रिजन १ मध्ये येणाऱ्या सात लायन्स क्लब्सच्या सदस्यांसाठी “संगम झोन सोशल २०२५” हा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे उत्साहात पार पडला. सेवा, सन्मान, बंधुभाव आणि लायनिझमच्या मूल्यांची प्रचिती देणारा हा कार्यक्रम उपस्थित सर्व लायन सदस्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला.
या कार्यक्रमाचे आयोजन संगमनेर सॅफ्रॉन सफायचे संस्थापक अध्यक्ष एमजेएफ ला. गिरीश मालपाणी व झोन चेअरपर्सन सी.ए. लायन प्रशांत रूणवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. संयोजनासाठी माजी अध्यक्ष ला. श्रीनिवास भंडारी आणि ला. अतुल अभंग यांनी कन्व्हेनर आणि को-कन्व्हेनर म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाला झोनमधील सर्व सात क्लब्स – लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई, श्रीरामपूर, संगमनेर सॅफ्रॉन सफायर, संगमनेर, संगमनेर किंग्ज, संगमनेर संगम आणि लिओ क्लब शिर्डी साई यांचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन आणि माल्यार्पणाने झाली. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ ला. विजय सारडा, जीएलटी को-ऑर्डिनेटर आणि नवनिर्वाचित इंटरनॅशनल डायरेक्टर एन्डॉर्सी एमजेएफ ला. सी.ए. जितेंद्र मेहता, पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन एमजेएफ ला. गिरीश मालपाणी, पास्ट डिस्ट्रीक्ट गव्हर्नर एमजेएफ ला. राज मुछाल, रिजन चेअरपर्सन एमजेएफ ला. आशिष बोरावके, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर इलेक्ट एमजेएफ ला. राजेश अगरवाल, व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर (१) इलेक्ट एमजेएफ ला. श्रेयस दीक्षित, व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर (२) इलेक्ट एमजेएफ ला. राजेंद्र गोयल आणि GST को-ऑर्डिनेटर एमजेएफ ला. सुनिता मालपाणी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची मुख्य आकर्षण ठरला “Mind Blast” हा मनोरंजक, जादूई आणि विचारांचे सीमारेषा पुसणारा मेंटलिस्ट शो, जो प्रसिद्ध जादूगार पिता-पुत्री जोडी म्हेली आणि झेनिया भुमगारा यांनी सादर केला. प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत हा कार्यक्रम अक्षरशः टाळ्यांच्या गजरात अनुभवला.

झोन चेअरपर्सन ला. प्रशांत रूणवाल यांनी आपल्या भाषणात सर्व क्लबचे कार्य वर्षभर कसे गतिमान होते याचा आढावा घेतला. त्यांनी अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या क्लब लीडर्सच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक करताना, “ही एक टीमवर्कची कहाणी आहे,” असे स्पष्ट केले. त्यांच्या कार्याची प्रशंसा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय सारडा आणि जीएलटी को-ऑर्डिनेटर जितेंद्र मेहता यांनीही केली.
कार्यक्रमात सर्व क्लबचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. झोनचे एकसंध नेतृत्व, सहकार्य, आणि सेवा भाव याचे प्रतिक म्हणून हा सोहळा सर्वांच्या मनात ठसा उमटवणारा ठरला. कन्व्हेनर ला. श्रीनिवास भंडारी आणि को-कन्व्हेनर ला. अतुल अभंग यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी ला. विजय सारडा यांनी झोन ५ रिजन १ अंतर्गत वर्षभर झालेले कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्याचे सांगत, “या झोनने लायनिझमची खरी सेवा भावना दाखवली आहे. ही ऊर्जा आणि समर्पण भविष्यातही टिकून राहो,” असे उद्गार काढले. त्यांनी झोन चेअरपर्सन ला. प्रशांत रूणवाल यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले.
ला. जितेंद्र मेहता यांनी आपल्या भाषणात झोनमधील कार्यशैली, उत्साह आणि सेवा वृत्ती यांचे विशेष कौतुक केले. “हे नेतृत्व केवळ क्लब्सपुरते मर्यादित नाही, तर लायनिझमच्या जागतिक स्तरावरही प्रभावी ठरणारे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी एमजेएफ ला. गिरीश मालपाणी आणि एमजेएफ ला. राज मुछाल यांच्या झोनसाठीच्या योगदानाचे विशेष गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ला. सुदीप हासे आणि ला. प्रियंका हासे यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here