दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने कै. ग स. सोनवणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व माजी प्राचार्य गणपत सखाराम उर्फ ग. स. सोनवणे यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजापूर सह पंचक्रोशीत व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. ग स. सोनवणे सर यांनी प्रदिर्घ काळ शैक्षणिक सेवा केली. सोयगाव महाविद्यालय औरंगाबाद येथे प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात भरीव असे काम केले. प्रागतिक शिक्षण संस्था, राजापूर संचालक व खजिनदार म्हणून त्यांनी काम पाहिले. राजापूर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून ते उत्कृष्ट काम करत होते. संगमनेर तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे मार्गदर्शक, कॉ. नागरे स्मारक समिती सदस्य, आम्ही राजापुरकर समिती सदस्य यासोबतच त्यांनी राजापूर व तालुक्यातील अनेक ठिकाणच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. दैनिक युवावार्ता परिवाराचे ते हितचिंतक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर राजापूर येथे आज गुरूवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने कै. ग स. सोनवणे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.