वाकचौरेंमुळे खासदार निधी जनतेला कळला – इंद्रजीत भाऊ थोरात

0
1350

तळेगाव येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रचाराची नियोजन बैठक संपन्न

तळेगाव दिघे ( प्रतिनिधी)–देशात सर्वत्र बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही .जनता सरकारला पूर्णपणे कंटाळली आहे. पूर्वी उत्तरेत खासदार निधी कुणाला माहीत नव्हता. तो भाऊसाहेब वाकचौरे यांनी केलेल्या कामामुळे जनतेला कळला असल्याचे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केले आहे.

तळेगाव दिघे येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे हे होते. तर व्यासपीठावर प्रभाकर कांदळकर, सुभाष सांगळे ,सचिन दिघे, बाबासाहेब कांदळकर, भारत मुंगसे ,केरू दिघे ,विठ्ठल दिघे, मधुकर दिघे, नामदेव दिघे,अनिल कांदळकर,रमेश दिघे, बाळासाहेब दिघे, मच्छिंद्र दिघे, सोपान दिघे, तुकाराम दिघे यांचासह विविध गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. राज्यघटना आणि सर्वधर्मसमभावचे तत्व जपणारा काँग्रेस पक्ष आहे. याउलट भाजपा सरकार फक्त निवडणुकांसाठी फसव्या जाहिराती करत आहेत. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही .शेतकरी पूर्णपणे वैतागला आहे .महिला असुरक्षित आहेत. महागाईने उच्चांक गाठला आहे .असे सगळे असताना भाजपकडून मात्र फसव्या जाहिराती केल्या जात आहे. आता लोक या फसव्या जाहिरातींना कंटाळले आहेत.

मागील खासदारांनी कधीही विकास कामांसाठी निधी दिला नाही. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रत्येक गावागावात निधी देऊन काम केले आहे आगामी काळात बूथ निहाय प्रत्येकाने नियोजन करून आपल्या गावामध्ये काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर महेंद्र गोडगे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. संपूर्ण राज्यांमध्ये महायुती विरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. आगामी काळात महाविकास आघाडीचे सत्कार सत्तेवर येणार असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे यांना मताधिक्य मिळून देण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सुभाषराव सांगळे, प्रभाकर कांदळकर यांनीही मनोगत व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले. यावेळी तळेगाव गटातील पदाधिकारी, महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here