लायन्स संगमनेर सॅफ्रॉनचा उपक्रम;राज्यातील नावाजलेले डान्स ग्रुप होणार सहभागी
यंदाच्या स्वातंत्र्योत्सवामध्ये जोश द डान्स शोमध्ये देशभक्तीपर गाण्यांबरोबरच विविध हिप हॉप, कन्टेंप्ररी, जॅझ आणि फोल्क डान्सचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्रचंड उर्जेत आणि उत्साहात हा कार्यक्रम होणार असून रसिक प्रेक्षकांनी सायंकाळी 7 च्या आधीच आपल्या जागा आरक्षित कराव्यात असे संयोजकांनी सांगितले.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन (सफायर) आयोजित स्वातंत्र्योत्सव या कार्यक्रमामध्ये या वर्षी ‘जोश द डान्स शो’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन मालपाणी लॉन्स, लक्ष्मी रोड, संगमनेर येथे संध्याकाळी 7 वाजता करण्यात आल्याचे प्रकल्प प्रमुख आणि लायन्स संगमनेर सफायरचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी व मा. अध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये मुंबई येथील आर. डी. डान्स ग्रुप, उरण-रायगड येथील जय हनुमान कला मंच, ध्रुव ग्लोबल स्कूल, स्ट्रॉबेरी स्कूल, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल हे डान्स ग्रुप आपल्या डान्सचा जलवा सादर करणार आहे. देशभरात आपल्या नृत्याविष्काराने मोहनी घालणार्या आर. डी. डान्स ग्रुप आणि जय हनुमान कला मंच यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांची मोठी गर्दी होणार आहे.
प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी यांनी गेल्या 20 वर्षांपासून संगमनेर सफायर स्वातंत्र्योत्सव उपक्रम राबवित असून मनींदरजितसिंग बिट्टा, आफळे महाराज, राहुल सोलापूरकर, डॉ. संजय मालपाणी आदी वक्त्यांनी आपली व्याख्याने दिली असल्याचे सांगितले. सामुहिक नृत्य स्पर्धा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
लायन्स सॅफ्रॉनचे अध्यक्ष स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्रा. डॉ. जितेश पाटील, खजिनदार पूजा मर्दा हे कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष मेहनत घेत असून प्रकल्प समितीमध्ये अतुल अभंग, धनंजय धुमाळ, सुनीता मालपाणी, नम्रता अभंग, राजश्री भंडारी, राजेश आर. मालपाणी, महेश डंग, उमेश कासट, कल्पेश मर्दा, सुदीप हासे, जितेश लोढा, नयन पारख, कृष्णा आसावा, विशाल थोरात, संतोष अभंग, अक्षय गोरले, तुषार डागळे, सचिन गाडे, कुलदिप कागडे, सागर हासे, विनायक भोईर, डॉ.योगेश गेठे, संदीप गुंजाळ, नामदेव मुळे यासह सर्व सदस्य या भव्य डान्स कार्यक्रमासाठी तयारी करीत आहेत.