नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

0
2336

अवघ्या तीन महिन्यापूर्वी झाले होते लग्न

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर- तालुक्यातील राजापूर येथील एका महाविद्यालयात शिक्षक सेवक म्हणून कार्यरत असणार्‍या शिक्षकाच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या दांपत्याचे अवघ्या तीन महिन्यापूर्वी लग्न झाले होते. ही घटना काल दुपारी उघडकीस आली या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोमल राजेंद्र थोरात (वय 22) असे या आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की मयत कोमल व राजेंद्र थोरात यांचा तीन महिन्यांपुर्वी विवाह झाला होता. तर अवघ्या काही दिवसांपूर्वी राजेंद्र थोरात हे राजापूर येथील महाविद्यालयात शिक्षक म्हणून रूजू होऊन ते राजापूरमध्ये स्थायिक झाले होते. दरम्यान काल शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसतांना कोमल थोरात हिने छताला दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचना केला. या प्रकणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान कोमल थोरात हिने आत्महत्या का केली याचे कारण अजून समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here