५० हजार रुपयांची बक्षिसे; मालपाणी समूहाचे सहकार्य

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- अखिल भारतीय स्तरावर माहेश्वरी समाजाच्या वंशोत्पत्ती दिन म्हणून साजर्या होणार्या महेश नवमी निमित्त संगमनेर तालुका माहेश्वरी सभा आणि सहयोगी संस्थांच्या वतीने 1 जून ते 9 जून 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष श्रीनिवास भंडारी आणि सचिव जुगलकिशोर बाहेती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. माहेश्वरी पंच ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सर्व स्पर्धांसाठी मुख्य प्रायोजकाची भूमिका पार पाडत या स्पर्धांसाठी 50 हजार रूपयांची बक्षिसे मालपाणी ग्रुप देणार असल्याचे जाहिर केले.

या सर्व कार्यक्रमांमध्ये माहेश्वरी पंच ट्रस्ट, माहेश्वरी महिला मंडळ, राजस्थान युवक मंडळ, युवा महेश, आणि अन्य सहयोगी संस्थांचा मोलाचा सहभाग आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष संजय रा. मालपाणी, कोषाध्यक्ष सुजितकुमार खटोड, संघटन मंत्री सचिन मणियार, सहसचिव जयप्रकाश भुतडा, पंच ट्रस्ट अध्यक्ष गिरीश मालपाणी, सरपंच विश्वनाथ कलंत्री, उत्सव समिती प्रमुख अतुल झंवर, प्रकल्प प्रमुख सुमित अट्टल, वेणुगोपाल कलंत्री आणि सिद्धांत झंवर यांनी केले आहे.

या उत्सवाच्या आयोजनामध्ये माहेश्वरी समाजातील सर्व वयोगटांतील सदस्यांना सहभागी करून घेणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश बाहेती हे देखील महेश नवमी उत्सव यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत.
4 जून रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर बालाजी मंदिरात महेश भगवान यांना अभिषेक होणार आहे. या अभिषेकाचे यजमान पल्लवी-शैलेश कासट व शिवानी-कृष्णा आसावा हे असतील. शोभायात्रेनंतर अल्पोपहाराची सेवा श्रीनिवास आणि राजेंद्र सोमाणी (राजेंद्र उद्योग समूह) यांच्यातर्फे दिली जाणार असून, रसपान सेवा ‘युवा महेश’ या संघटनेने स्वीकारली आहे.
9 जून रोजी खांडगाव येथे महेश भगवान अभिषेकाचे आयोजन करण्यात आले असून, याचे यजमान कलावती-सोमनाथ चांडक आणि ज्योती-संतोष चांडक हे असतील. याच दिवशी श्री खांडेश्वर मंदिर, खांडगाव येथे महेश्वरी समाजाचे ‘गेट टू गेदर’ आणि ‘म्युझिकल हौजी गेम’ चा समारंभपूर्वक समारोप होणार आहे. शोभायात्रा व गेट टू गेदरच्या नियोजनाची जबाबदारी राजस्थान युवक मंडळाने स्वीकारली आहे.
सप्ताहभरात होणार्या विविध स्पर्धांमध्ये 1 जून रोजी ‘आयर्न मॅन’ स्पर्धा, 2 जून रोजी रस्सीखेच, जलद चालणे, कॅरम स्पर्धा, 3 जून रोजी ‘युवा महेश’च्या सहकार्याने रक्तदान शिबिर व चित्रकला स्पर्धा, 5 जून रोजी स्विमींग, बॅडमिंटन, तसेच माहेश्वरी सीनिअर महिला मंडळाच्या सहकार्याने ‘एक मिनिट स्पर्धा’ घेण्यात येणार आहे. 6 आणि 7 जून रोजी ‘माहेश्वरी फ्रेंड्स प्रीमियर क्रिकेट लीग’ (MFPL) आयोजित केली जाईल. 8 जून रोजी ‘ट्रेजर हंट’ आणि भजन स्पर्धा होणार असून, उत्सवाचा समारोप 9 जून रोजी होईल.
