लायन्स सफायरचे कार्य अवघ्या महाराष्ट्रात प्रेरणादायी – आ. सत्यजित तांबे

500 वंचित मुलांसोबत साजरी केली ओम साई दिवाळी

या दिवाळी मेळ्यामध्ये संग्राम मूकबधिर विद्यालय, सांदीपनी गुरू आश्रम, रमा यशोधरा विद्यार्थिनी आश्रम, रिमांड होम, जय शंकर बालगृह यामधील 500 विद्यार्थी सहभागी झाले. या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी लोककला, नृत्य, भजन यांचे सादरीकरण केले. मूक बधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभंग आणि नृत्य बघून सर्वजण चकित झाले.

संगमनेेर (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या लायन्स संगमनेर सफायरने यावर्षी ओम साई दिवाळीचे आयोजन मालपाणी हेल्थ क्लब येथे केले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे व इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट रचना मनीष मालपाणी उपस्थित होते.
लायन्स सफायरचे सामाजिक कार्य सर्व महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी आ. सत्यजित तांबे म्हणाले. रचना मालपाणी यांनी संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष अतुल अभंग आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले. याप्रसंगी महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, उद्योजक जय मालपाणी, बाळासाहेब देशमाने, सत्यम वारे, रामेश्वर भंडारी, ओंकार देशमाने, लायन्स सफायर सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.


कोरोनानंतर अनेकांची घरे उध्वस्त झाली, संसार उघड्यावर पडले, अनेक मुले अनाथ झाले. वंचित मुलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविण्यासाठी या ओम साई दिवाळी मेळ्याचे आयोजन करत असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सांगितले. ओम साई दिवाळी मेळ्याचे प्रकल्प प्रमुख म्हणून गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, देवीदास गोरे, अनिरूध्द डिग्रसकर, राजेश मालपाणी, महेश डंग काम बघितले असून अध्यक्ष अतुल अभंग, सचिव जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांच्या मार्गदर्शनाखील लायन्स सफायरमधील सर्व सदस्यांनी प्रकल्प यशस्वी होण्यासाठी मदत केली.


500 वंचित मुलांसाठी या दिवशी डी.जे. नाईट, मुलांचे डान्स कार्यक्रम, डिनर, गिफ्ट, दिवाळी मिठाई वाटप आणि भव्य आतिषबाजीचे नियोजन करण्यात आले होते. श्री साईबाबांनी लक्ष्मी नावाच्या छोट्याशा मुलीसोबत पाण्याने दिवे लावून दिवाळी साजरी केली. ओम साई दिवाळी मेळा निमित्ताने वंचित मुलांचा दिवाळीमधील आनंद द्विगुणीत झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनिता मालपाणी व पूजा मर्दा यांनी केले तर आभार श्रीनिवास भंडारी यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख