आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ प्रत्येक गावात प्रचार फेरी संपन्न
लोकशाहीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा -आमदार थोरात
निवडणूक झाली की लगेच आपण कामाला सुरुवात करतो. मागील अनेक वर्ष तालुक्याचे नेतृत्व करताना एक दिवसही विश्रांती घेतली नाही. तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असून त्यासाठी आपण काम करत आहोत. जनता ही आपल्यावर प्रेम करते. मी पाच वर्षे काम करतो. जनता माझ्यासाठी प्रचाराचे काम करते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्सव म्हणून तालुक्यातील जनता विधानसभा निवडणूक करत असते. मोठे मताधिक्याने संगमनेर सह महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जनतेच्या पाठिंबामुळे विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संगमनेर ( प्रतिनिधी)–सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या संगमनेर तालुक्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्यभरात महाविकास आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता आणि नागरिकांनी निवडणूक हाती घेतली असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक गावात व संगमनेर शहरात वार्ड निहाय जल्लोषपूर्ण वातावरणात फेरी काढून या प्रचाराची सांगता झाली. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी च्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या विविध ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या सभा होत्या. आमदार बाळासाहेब थोरात यांनी अकोले, नारायणगाव, जुन्नर येथे सांगता सभा केल्या याचबरोबर संगमनेर मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मात्र संगमनेर तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हाती घेतली असून लोकशाहीचा महोत्सव म्हणून होणाऱ्या या निवडणुकीमध्ये तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक तरुण, महिला युवक सर्व मोठ्या आनंदाने सहभागी झाले आहेत.
देवकवठे ते बोटा असा मोठा विस्तीर्ण मतदारसंघ असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व संगमनेर शहरात प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. स्थानिक कार्यकर्त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला. समनापुर मध्ये आमदार बाळासाहेब थोरात सहभागी झाले तर तळेगाव भागामध्ये डॉ जयश्रीताई थोरात यांनी सहभाग घेतला .आमदार डॉ सुधीर तांबे यांनी निमोन भागात व संगमनेर शहरात सहभाग घेतला तर सौ दुर्गाताई तांबे यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये आपली उपस्थिती नोंदवली. आमदार सत्यजित तांबे यांनी घुलेवाडी, राजापूर ,जवळेकडलग, येथील संवाद यात्रेमध्ये सहभाग घेतला. तर रणजीतसिंह देशमुख हे अंभोरे येथील संवाद यात्रेत सहभागी झाले. याचबरोबर शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय व मित्र पक्षांचे पदाधिकारी ही या प्रचार फे-यामध्ये सहभागी झाले. राज्यभरात हा अभिनव उपक्रम राबवून प्रचाराची सांगता करणारे संगमनेर हे प्रचारातही दिशादर्शक ठरणारा सुसंस्कृत तालुका ठरला आहे