अवैध वाळूतून उभारले बसस्थानक, साडेतीन कोटींचा दंड
अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

अवैध वाळू

सर्व आरोप व कारवाई राजकीय द्वेषातून – आर.एम.कातोरे

युवावर्ता (प्रतिनिधी)

संगमनेर येथील BOT तत्वावरील बस स्थानक व व्यापारी संकुल बांधकाम मध्ये अवैध गौण खनिज विनापरवाना अवेध वापर करून विकासक आर.एम.कातोरे यांनी गौण खनिज (वाळू, मुरूम, डबर) विशेषता वाळूचा कुठलाही लिलाव संगमनेर येथे झालेला नसताना याकामासाठी मोठ्या प्रमाणात प्रवरा, मुळा नदीपात्रातून वाळू तस्करी करून हे बांधकाम केलेले आहे तसेच संगमनेर तालुक्यात त्या कालावधीत कोणताही वाळूचा लिलाव झालेला नसतानाही वापरलेली वाळू पूर्णपणे अवैध, वाळू तस्करांकडून अथवा विकासकाने स्वत: नदी पात्रातून विनापरवानगी घेऊन वापरलेली आहे तसेच बेकायदेशीरपणे उत्खनन करून दगड, मुरूम वापरलेले आहे अशी तक्रार २०१८ मध्ये अमोल खताळ पाटील यांनी तहसीलदार, संगमनेर यांच्याकडे केली होती तत्कालीन महसूलमंत्री यांच्या दबावापोटी तक्रार कडे दुर्लक्ष केले जात होते तसेच विकासक कातोरे स्थानिक कॉंग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी दिरंगाई केली जात होती तरी अमोल खताळ यांनी वेळोवेळी पाठपुरावा, स्मरणपत्र देऊन प्रकरण तडीस नेले.

माहिती अधिकार मध्ये मिळविलेल्या सर्व कागदपत्रा मध्ये बस स्थानक विकासक कातोरे यांनी गौण खनिजबाबत कुठलीच परवानगी घेतलेली नाही असे उत्तर तहसील कार्यालय कडून मिळालेले होते. विकासकाने तहसीलदार संगमनेर महसूल विभागाच्या तोंडी सूचनेनुसार आम्ही रॉयलटी भरली आहे असे मोघम लेखी पत्र दिले होते विकासक BOT कामाबाबत महसूल विभागाची दिशाभूल करून कुठलाही खाण पट्टा आरक्षित नसताना मोघम चलन ३० किवा ३१ मार्चला ३ चलन भरणा दाखवत दाखविला आहे तो पूर्णता गौण खनिज अधिनियम तरतुदीच्या विरोधी असून त्याबाबत कुठल्या खाण पट्ट्यातून याचा उल्लेख नाही. चलन बाबत परवानगी पत्र, वाहन क्रमांक, पंचनामा रॉयल्टी, कार्यालयाकडे मागणी केलेले पत्र, ठेकेदाराने आरक्षित केलेला खान पट्टा दगड,मुरूम,वाळू याबाबत गौण खनिज परवाना नोंदवही तपासली असता त्यामध्ये कोणताही परवाना दिलेचे आढळून आलेले नाही.

विकासकाने तहसीलदार संगमनेर यांना सादर केलेल्या ५२० ब्रासच्या वाळू परवाना प्रती बनावट

· विकासक कातोरे याने अंदाजे ५२० ब्रासच्या बनावट पावत्या कोपरगाव येथील काही लिलाव धारकांकडून घेतलेल्या आहेत त्या पावत्याची वाहन क्रमांकसह पडताळणी करून मिळणे बाबत मी तहसीलदार, कोपरगाव यांच्या कार्यालयात माहिती अधिकार अर्ज दिलेला होता त्या नुसार तहसील कार्यालय, कोपरगाव क्र.कावि/गौख/५९२/२०१९ दि. ०७/०८/२०१९ नुसार पावती पडताळणी केली असता त्यांची नोंद आढळून आलेली नाही याचा अर्थ त्या पूर्णता बनावट असल्याचे सिद्ध झाले.· ७२४.१८ ब्रास आर्फिसियल wash sand SAND ची जी बिले विकासकाने जोडलेली आहे ते स्वाती राणी स्टोन क्रेशर and सप्लायर्स मु.जामगाव, अकोले यांच्याकडे artificial wash sand चा कुठलाही अधिकृत परवाना नाही. स्वाती राणी स्टोन चे गौण खनिज वाहतूक परवानाचे रजिस्टरची नोंद आढळून येत नाही असे लेखी दिलेले आहे. तहसीलदार अकोले यांना दि. १५/११/२०१९ रोजी माहिती अधिकार अर्ज देऊन स्वाती राणी स्टोन क्रेशरचा कृत्रिम वाळू (artificial wash sand) परवाना प्रत मागितली असता त्यांनी माझा मूळ अर्ज उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांच्याकडे वर्ग करून मला क्र.कावि/जमा/मा.अ./१७४४/२०१९ दि. १९/११/२०१९ नुसार असा कुठलाही परवाना या कार्यालयातून दिलेला नाही असे लेखी दिलेले आहे.

· मुरूम -४७२.४७ ब्रास व डबर -८९.५९ वापरबाबत संगणकावरील बिले सादर केलीली आहे त्यामध्ये पिंपळे येथील गट ४४१ मधून घेल्याचे पुरावे दिले आहे त्यांची सुद्धा माहिती अधिकार मध्ये पडताळणी केली असता त्यामध्ये वाहतूक परवाना पावत्या नाही. अकोले येथील राजाराणी स्वाती स्टोन क्रेशर येथून ७२४.१८ ब्रास आर्फिसियल wash sand बाबत सुद्धा गौण खनिज अधिनियम नुसार गौण खनिज वाहतूक परवाना नाही अशी उत्तर माहिती अधिकार मध्ये मिळालेले आहे.BOT तत्वावरील बस स्थानक व व्यापारी संकुल कामासाठी वापरण्यात आलेले गौण खनिज उत्खनन बाबत कोणत्याही प्रक्ची परवानगी घेतली नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार वाळू, मुरूम, डबर, क्रश संड प्रकरणी ३,६६,२२,८६९/- ( ३ कोटी ६६ लाख २२ हजार आठशे एकूण सत्तर रुपये ) दंडात्मक कारवाईचे आदेश दि. ०९/०१/२०२३ रोजी काढले.विद्यमान महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अमोल खताळ पाटील यांनी ४ वर्ष सर्व पुरावे असतना प्रलंबित प्रकरणाची तक्रार केली होती त्यानंतर याप्रकरणाची सुनावणी होऊन दंडात्मक कारवाई तहसीलदार यांनी करावी लागली. विकासक कातोरे यांना झालेला दंड जोपर्यंत भरणा केला जात नाही तो पर्यंत याबाबत पाठपुरवा सुरु राहणार आहे असे अमोल खताळ पाटील यांनी सांगितले .

राजकीय द्वेषातून दंडात्मक कारवाई- आर. एम. कातोरे
संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या भव्य दिव्य अशा बसस्थानक उभारण्याची संधी आम्हाला युती शासनाच्या काळात मिळाली. मिळालेल्या या संधीचे सोने करत सर्व शासकीय नियमांचे पालन करत सुंदर, सुसज्ज असे बसस्थानक उभारले. दरम्यान धांदरफळ गटातून जिल्हा परिषदमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने राजकीय द्वेषातून अमोल खतळ यांनी आपल्यावर चुकीचे आरोप केले आहे. तसेच आपले राजकीय वजन वापरून खताळ यांनी महसूल प्रशासनाची दिशाभूल करून आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडले आहे. असा आरोप माजी जि. प. सदस्य रामहारी कातोरे यांनी केला आहे.


याबाबत अधिक बोलताना श्री. कातोरे म्हणाले अमोल खताळ हे माझ्या धांदरफळ गटातील असून मी जि. प. सदस्य असल्याने वेळोवेळी गटात झालेल्या राजकीय वादातून अमोल खताळ यांनी आपल्यावर आरोप केले आहे. त्यांनी आपली राजकीय ताकद वापरून महसूल खात्यामार्फत कारवाई करण्यास भाग पाडले आहे. सन 2016 रोजी एस टी महामंडळाचे संगमनेर बस स्थानक पुनरबांधकामाची वर्क ऑर्डर आमच्या कंपनीला मिळाली असता महामंडळाने अधिसूचित केलेले सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करूनच बस स्थानकाचे काम केलेले आहे. बस स्थानक बांधत असताना जुन्या बस स्थानक इमारतीचे रॅबिट, मुरूम, दगड महामंडळाने वापरण्याची परवानगी दिली होती. त्या पोटी महामंडळाला १७,६८,४३८ रुपये सॅलरी व्हॅल्यू महामंडळाकडे भरली आहे. त्याचे चलन देखील आमच्या कडे आहेत. तसेच वेळोवेळी आम्ही गौण खनिज वाळू खडीची रॉयल्टी प्रांतकार्यालयाच्या सांगण्यावरून भरलेली आहे. तसेच आमच्याकडे सर्व गौण खनिज संबधीत शासनाकडे भरणा केलेले चलन असून देखील संबंधित कार्यालयाने आमची कुठली बाजू ऐकून न घेता दंडात्मक कारवाई केली. केलेली ही कारवाई पुर्णतः राजकीय दबाव पोटी केलेली आहे. संबंधित कार्यालयाने त्याची शहानिशा करून घ्यावी व केलेली कारवाई चौकशी करून निकाली काढावी अशी मागणी आर. एम. कातोरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख