माझ्या केसाला धक्का लागला असता तर संगमनेर नेस्तनाबूत झालं असतं – डॉ. सुजय विखे

संगमनेरमध्ये आलोय हिम्मत असेल तर आणा कितीही लोक मी ८ वाजेपर्यंत थांबतो – खताळांच्या सांगता सभेत विखेंच्या धमक्यावर धमक्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदेची अनुपस्थिती

संगमनेर मध्ये मुख्यमंत्र्यांचा सभेचा फुसका बार – अमर कातारी
मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या नावाखाली तरुणांना फसवले ; बनवाबनवी उघड

ज्या पक्षाकडून उमेदवारी त्या पक्षाचा एकही नेता अमोल खताळांच्या प्रचाराला नाही

आक्रमकपणाच्या नावाखाली विखेंचीआरडाओरड जास्त

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचाराची सांगता सभेत दक्षिण नगरचे पराभूत माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अनेक डरकाळ्या फोडत पुन्हा एकदा टायगर अभी जिंदा है चा नारा दिला. सभा सुरू झाल्यानंतर माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे लवकर निघावं लागेल असे डॉ. सुजय विखे म्हणाले. मात्र दुसरीकडे मला पळकुटा म्हणतात परंतु माझ्या केसाला जरी धक्का लागला असता तर संगमनेर पेटले असते. संगमनेरची राख होऊ नये म्हणून आपण निघून गेलो. मी तुमच्या शहरात आलो आहे आणि ८ वाजेपर्यंत थांबतो कोण येतो तेच बघतो अशी वलग्ना करत एक प्रकारे थोरातांचे नाव न घेता धमक्यावर धमक्या दिल्या. जाणता राजा मैदान १५, १६, १७, १८ रोजी काँग्रेसने बुक करून ठेवले. स्वत: सभा घेतल्या नाही आणि बुकींग मात्र करून ठेवले. पण त्यांना माहित नाही की, हम जहाँ खडे हो जाते है लाईन वहीसे शुरू हो जाती है असा टोला सुजय विखे यांनी थोरातांना लगावला.


मागच्या १५ दिवसांमध्ये आ. थोरात यांनी रोज शिर्डी विधानसभा मतदार संघात सभा घेतल्या. शरद पवार, प्रियंका गांधी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. ४० वर्षे काम न केल्यामुळे आ. थोरात या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात आणू शकले नाही असा आरोप विखेंनी केला. फ्लेक्स, पॅम्प्लेट, स्टेज, साऊंड सिस्टीम संगमनेरवरून आणली गेली. तुमचा खुट्टा उपटायला आज ही जनता नवीन नगर रोडवर जमा झाली आहे अशा आविर्भावात विखेंनी थोरातांवर टिका केली.
ज्या लोकांचं तुम्ही कंबरड मोडल तेच तुमचा माज मोडतील असे विखे म्हणाले. आजही सुजय विखे यांची भाषा धमकीचीच होती. धांदरफळ सभेनंतर मी नेहमीच्या रस्त्याने गेलो असतो आणि माझ्या केसाला धक्का लागला असता तर माझ्या चाहत्यांनी संगमनेर नेस्तनाबूत केलं असतं. संगमनेर वाचवण्यासाठी मी दुसऱ्या मार्गाने गेलो. संगमनेरची नासाडी होऊ नये, संगमनेर वाचावे म्हणून मी निघून गेलो. वाघ जेव्हा दोन पाऊले मागे जातो तो मोठी झेप घेण्यासाठी जातो. आता तुमच्या शहरात आलोय, हिम्मत असेल तर येवून दाखवा अशी धमकीच सुजय विखे यांनी दिली. तुमच्या शहरात प्रचारफेरी घेतोय किती लोक आणायचे आणून दाखवा. या स्टेजवर सुजय विखे रात्री आठ वाजेपर्यंत थाबून राहतो कोण येतो बघतो तेच बघतो अशी धमकीच त्यांनी आ. थोरातांना दिली. यावेळी सुजय विखे यांनी आ. थोरात यांच्यावर अनेक आरोप करताना संस्था बंद पाडल्या, काँन्ट्रॅक्टरांना मोठे करत भ्रष्टाचाराचे आरोप केले. २४ तारखेला माझा वाढदिवस असून हा टायगर संगमनेरमध्ये संध्याकाळी वाढदिवस साजरा करायला येणार असे सुजय विखे म्हणाले.

संगमनेर तालुका हा एकनिष्ठ विचारांचा आहे. आमदार बाळासाहेब थोरात एक काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहे. तर संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करून सरकार स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेर मध्ये पाऊल ठेवू शकणार नव्हते. मात्र त्यांच्या नावाखाली तालुक्यातील तरुणांना बनवाबनवी करून संगमनेरात बोलून फसवले असल्याची घाणाघाती टीका अमर कतारी यांनी केली असून मुख्यमंत्र्यांच्या सभेचा फुसका बार झाल्याचे म्हटले आहे. कतारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्याचे मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आणि संगमनेर मध्ये गद्दारीला माफी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथे येणार नव्हते.हे सर्वश्रूत होते. कोणताही शासकीय अधिकृत दौरा नव्हता. मात्र राष्ट्रवादी – काँग्रेस – भाजप शिंदे गट असा प्रवास करणारा येथील उमेदवार यांनी मुख्यमंत्री येणार अशी खोटी जाहिरात केली.

संगमनेर तालुक्या ऐवजी बाहेरच्या तालुक्यातील तरुण बोलवले. श्रीकांत शिंदे सुद्धा येणार नव्हते.मात्र अशी ही बनवाबनवी करून तरुणांना यांनी फसवले. एक तर तुम्ही शिंदे सेनेचेही एकनिष्ठ नव्हते. तुम्ही भाजपशी एकनिष्ठ नव्हते. मूळ शिवसेना आणि भाजपवाले लांब आहेत.फक्त लोणी विखेंच्या इशारावर नाचणारी भाजप आणि शिंदे सेना शहरात असून त्यांना कोणीही थारा देत नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची मोठी पंचायत झाली असून मुख्यमंत्री आणि कोणीच पदाधिकारी संगमनेर मध्ये आले नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांनी तीव्र संताप व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख