गंगुबाई लक्ष्मण आहेर यांचे निधन

0
1752

घारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश आहेर यांना मातृशोक

युवावार्ता (प्रतिनिधी)
घारगाव –
घारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रगतशील शेतकरी आणि प्रथितयश उद्योजक सुरेश लक्ष्मण आहेर यांच्या मातोश्री गंगुबाई लक्ष्मण आहेर (वय – 90 वर्षे) यांचे शनिवार दिनांक 8 जून 2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
गंगुबाई आहेर या अतिशय मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या होत्या. भजन-कीर्तन करणे हा त्यांचा छंद असायचा. अतिशय कठीण काळामध्ये लक्ष्मण आहेर आणि गुंगूबाई आहेर यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आणि स्वतःच्या पायावर उभे केले. मुले शांताराम आणि सुखदेव हे मुंबईमध्ये उद्योजक म्हणून काम करत आहेत. तर सुरेश आहेर घारगावमध्ये अनेक संस्थामध्ये कार्यरत आहेत. घारगावचे ते माजी उपसरपंच होते. गंगुबाई आहेर यांच्या पश्‍चात पती, तीन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे, पतवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने घारगाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी 8 जून 2024 रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्यावर घारगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गंगुबाई आहेर यांना दैनिक युवावार्ता परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here