
10 लाख 52 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
हिंगणीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर चोरीचा पर्दाफाश
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – हिंगणी (ता. श्रीगोंदा) येथील विठ्ठल रुख्मीणी मंदीराच्या गाभाऱ्यातील चांदीचे दागिने लंपास करणारे सराईत चोरटे अहिल्यानगर एलसीबी च्या पथकाने पकडले आहेत. : पथक हे यापुर्वी मंदीर चोरीचे गुन्हे करणारे आरोपींचा अभिलेख तपासुन तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी 1) भास्कर खेमा पथवे (रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर) याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने आरोपीच्या राहत्या परिसरामध्ये जावुन सलग 4 दिवस तपास केला. मात्र आरोपी हा सतत बाहेरगावी फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली.

व्यवसायीक कौशल्याचे आधारे आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा चारचाकी वाहनातून संगमनेर कडून पारनेरच्या दिशेने येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार टाकळीढोकेश्वर परिसरामध्ये सापळा रचून आरोपी 1) भास्कर खेमा पथवे, (वय 50 वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर,) 2) राजेंद्र ठकाजी उघडे, (वय 33 वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. त्याचेकडे मंदीर गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी त्यांचा साथीदार 3) संजय भास्कर गावडे (रा. नांदुरीदुमाला, ता. संगमनेर (फरार) याचेसह गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ताब्यातील आरोपींकडून 5,10,000/- रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा, 30,000/- रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, 8400/- रुपये रोख रक्कम, 5200/-रुपये किमतीचे चोरी करण्याकरीता वापरण्यात आलेली हत्यारे, 5,00,000/- रुपये किमतीची तवेरा गाडी क्रमांक एम.एच. 04 सी.एम. 6712 असा एकुण 10,52,600/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, फुरकान शेख, दिपक घाटकर, भिमराज खर्से, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, आकाश काळे, योगेश कर्डीले, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


















