लग्न लावून देतो म्हणून साडेतेरा लाखांची फसवणूक

0
1462


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सेवानिवृत्ती झाल्यानंतर आणि पत्नी वारल्यानंतर कोणीतरी जोडीदार असावा. यासाठी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय एका सेवानिवृत्त कर्मचार्‍याला चांगलाच महागात पडला आहे. ओतूर, जुन्नर येथील या सेवानिवृत्त कर्मचार्‍याला संगमनेरातील 5 ते 6 जणांनी लग्नाचे अमिष दाखवून आणि दोन महिलांचे लग्न लावून देत तब्बल 13 लाख 68 हजार रूपयांची फसवणूक केली आहे.


महादू सावळेराम भोईर, (रा. ओतूर, जुन्नर, जि. पुणे) हे एका कंपनीत नोकरीस होते. दरम्यानच्या काळात त्यांची पत्नी मयत झाली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यातून सोन्याबापू पाटोळे यांच्या माध्यमातून त्यांची संगमनेरातील एका महिलेशी ओळख झाली. या महिलेने त्यांचे स्वाती नावाच्या महिलेशी लग्न लावून दिले. मात्र ही महिला नांदयला आलीच नाही. उलट साडेसात लाख रूपये घेऊन पसार झाली. त्यानंतर भुईर यांनी संगमनेरातील महिलेकडे तक्रार केली असता या महिलेने पुन्हा त्यांचे संचिता या महिलेसोबत लग्न लावून दिले. मात्र ही महिलाही 4 लाख 77 हजार रूपये घेऊन पसार झाली. आपण फसावले गेल्याने भोईर यांनी संगमनेरातील पाच जणांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here