तालुक्याची अस्मिता व स्वाभिमानासाठी आ थोरात यांना मोठे मताधिक्य द्या–डॉ. जयश्रीताई थोरात

तळेगाव भागामध्ये मोटरसायकल रॅलीला तरुणांचा मोठा प्रतिसाद

संगमनेर ( प्रतिनिधी)–संगमनेर तालुका सुसंस्कृत विचारांचा आहे. आपला तालुका दादागिरी करत नाही आणि कुणाची दादागिरी सहन करणार नाही. मागील महिन्यामध्ये बाह्यशक्तीकडून तालुक्यात अशांतता निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला तो निंदनीय असून या घटनेच्या विरोधात तालुका उभा ठाकला. एक संगमनेरी दाखवण्यासाठी सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभे राहून मोठे मताधिक्य असे आवाहन युवा नेत्या डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये तळेगाव दिघे, वरझडी, कासारे ,लोहारे येथे भव्य मोटरसायकल रॅली झाली यानंतर तळेगाव चौकात झालेल्या सभेच्या बोलत होत्या. यावेळी डॉ सुधीर तांबे, प्रभाकर कांदळकर, नामदेव दादा दिघे ,सचिन दिघे, अनिल कादळकर, आदींसह तळेगाव भागातील नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, धांदरफळ मध्ये पूर्वेकडच्या नेत्यांच्या स्टेजवरून माझ्या नव्हे तर संपूर्ण महिलांचा अपमान केला गेला. आणि ही गोष्ट आपल्या सुसंस्कृत तालुक्याला सहन झाली नाही तालुका पेटून उठला. तालुका काय करतो हे त्यांनी आता पाहिले आहे. तालुक्याची अस्मिता आणि स्वाभिमान आपल्याला जपायचा आहे आमदार बाळासाहेब थोरात यांना राज्यात मोठी संधी आहे त्या मोठ्या संधीमुळे तितके मोठे मताधिक्य देणे हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याने सर्वांनी तीन दिवस आपला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून तालुक्याच्या अस्मितेच्या लढाईत सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले

This image has an empty alt attribute; its file name is job1.png

माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर चालणारा हा तालुका आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहकार शिक्षण शेती या सर्व क्षेत्राला राज्यात अव्वल बनवले आहे. विकासाच्या योजना राबवले आहे. निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून या भागाला पाणी दिले आहे. काही लोक येथील विकास मोडण्यासाठी विविध योजना करत आहेत. आणि आपल्या तालुक्यातील खबरे त्यांना बळी पडत आहेत. त्यामुळे आपल्या नेता हा आपला स्वाभिमान असून सर्वांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात यांना राज्यातून सर्वाधिक मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर तरुणांनी काढलेल्या भव्य मोटरसायकल रॅलीला तळेगाव भागातून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख