अद्विता आनंद हासेची वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

अद्विता आनंद हासे

70 पेक्षा जास्त प्रसिध्द व्यक्तिमत्त्वांच्या इतिहासाचा अभ्यास करून साकारल्या वेशभूषा

हासे परिवाराच्या लौकीकात मानाचा तुरा…


संगमनेर (प्रतिनिधी) – कोव्हिड 19 च्या अतिशय भयानक कालखंडामध्ये संपूर्ण जनजीवन ठप्प होते. शाळा, महाविद्यालये बंद होते. लहान मुलांना पटांगणामध्ये खेळण्यासाठी अनूमती नव्हती. ऑनलाईन पध्दतीने शाळा चालविल्या जात होत्या. लहाणग्यांचे ऑनलाईन लेक्चर्स आणि अभ्यास संपल्यानंतर घरातच खेळणे हा दिनक्रम होता. मोबाईल, संगणक आणि लॅपटाॅपसारख्या इलेक्ट्राॅनिक संसाधनांपासून मुलांना दूर ठेवणे हे पालकांसमोर या काळात मोठे आव्हान होते. लहान मुलांना विविध पुस्तके वाचून दाखविणे हे त्यांच्यासाठी काहीसे कंटाळवाणे होऊन जाते.


अशा वेळी विविध महात्म्यांच्या वेशभूषा करून त्याचे फोटो काढणे आणि त्याबरोबरच त्यांचा इतिहास, त्यांनी केलेली समाजोपयोगी कामे हे समजून सांगितल्याने त्यांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक ज्ञानात विशेष भर पडते. हे ओळखून अद्विता आनंद हासे हिच्या पालकांनी तिच्याकडून स्वामी विवेकानंद, डाॅ. बाबासाहेब आंबेकर, चंद्रशेखर आझाद, अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, चाणक्य, गौतम बुध्द, महात्मा गांधी, भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, वीर हनुमान, खंडेराय महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे आदी महात्म्यांच्या वेशभूषा करून घेतल्या. या सर्व महात्म्यांचा इतिहास समजावून सांगितला. यामुळे तिला इतिहासाचे आकलन लवकर झाले.


वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्ड ही सरकारी नोंदणीकृत संस्था असून जे चिमुकले अधिक प्रतिभावान आहेत, ज्यांच्यामध्ये क्षमता आणि कौशल्ये अधिक आहेत आणि ज्यांनी काहीतरी विशेष उपलब्धता केली आहे त्यांची वर्ल्डवाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होते.सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ७० हून अधिक ऐतिहासिक तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या वेषभुषा करणारी सर्वात कमी वयाची मुलगी या कॅटेगरीमध्ये तिची दखल घेतली गेली आहे. जेव्हा अख्खं जग कोरोना लॉकडाऊनमुळे थांबलेलं होतं त्यावेळी पुजा हासे (अद्विताची आई) यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. सुरुवातीला काही व्यक्तीरेखांची वेषभुषा केल्यानंतर घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध व्यक्तींच्या वेषभुषा करण्याचे ठरविले आणि बघता बघता ७० हून अधिक प्रसिद्ध व्यक्तींच्या वेषभुषा त्यांनी केल्या. प्रत्येक व्यक्तीरेखेनुसार हावभाव करुन अद्विताने काढलेले फोटो हे भन्नाट आहे.

अद्विताच्या या उपक्रमासाठी अमृतवाहिनी इंटरनॅशन स्कूलच्या सर्व शिक्षकांनी सर्वोतपरी मदत केली. संस्थेचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, अमृतवाहिनी स्कूलच्या संचालिका शरयूताई देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्या सेठी मॅडम यांनी तिचे अभिनंदन केले आहे.अद्विताच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. दैनिक युवावार्ता परिवार व हासे परिवाराच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख