महाविकास आघाडीच्यावतीने संगमनेरात मशाल रॅली

0
1193

देशाची लोकशाही वाचवण्यासाठी तरूणांनी एकत्र येऊन काम करावे – जयश्रीताई थाेरात

युवावार्ता ( प्रतिनिधी )
संगमनेर – महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गट, युवासेना, काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मित्रपक्षाच्या वतीने संगमनेर शहरात भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला संगमनेर शहरातील युवक व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
संगमनेर नगरपालिकेपासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे, नितेश साटम, अमर कतारी, अमित चव्हाण, किरण घोटेकर, सौरभ देशमुख, रोहित वाकचौरे ,निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, गौरव डोंगरे, सोमेश्वर दिवटे, आदींसह विविध पदाधिकारी सहभागी होते.
यावेळी बोलताना सूर्यकांत शिंदे म्हणाले की, शिवसेनेत झालेल्या दूफळीनंतर ठाकरे गटासमोर नवीन पक्षचिन्ह सामान्य मतदारांच्या पर्यंत पोहचवणे आव्हानात्मक होते मात्र ठाकरेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नवे पक्षचिन्ह घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असल्याने वाकचौरे ही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत.
र डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, भाजपा सरकारने युवकांचा मोठा भ्रमनिरास केला आहे. दोन कोटी नोकर्‍या देण्याऐवजी अनेकांना बेरोजगारी दिली.महाराष्ट्रात झालेली पक्ष फोडाफोडी जनतेला मान्य नसून त्यामुळे मोठी चीड निर्माण झाली आहे.याचबरोबर संपूर्ण देशातही भाजपा विरोधी मोठी लाट निर्माण झाले असल्याने चार जूनला देशामध्ये एनडीएचे सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले असेल असा ठाम विश्वास व्यक्त करताना तरुणांनी या निवडणुकीमध्ये देशाची लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन केले.
महाराष्ट्रप्रेमी नागरिक महाविकास आघाडीला विजयी करण्यार असल्याचे प्रतिपादन युवासेना महाराष्ट्र राज्याचे कोअर कमिटी सदस्य अंकित प्रभू यांनी केले तर अमर कतारी म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडून देण्यासाठी आणि आदरणीय कुटुंबप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब व महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करण्यासाठी संगमनेर मधील नागरिकांनी काम करावे असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here