जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात स्तंभाचे जतन व सुशोभीकरण करण्याची मागणी
युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – अकोले शहरातून जाणार्या कोल्हार – घोटी राष्ट्रीय राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूने सुरु असलेल्या बंदिस्त गटारीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालू असून गटारीच्या तळातील भागात काँक्रिट पाण्यात ओतले जात आहे. तसेच गटारीवर टाकलेल्या स्लॅबला खाली व वरती मोठ्या प्रमाणात तडे गेलेले दिसत आहेत.
सदरचे निवेदन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम अभियंता महेंद्र वाकचौरे यांना देण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोलेचे तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, दत्ता ताजणे यांनी अशी माहिती दिली. तसेच सदर कामाच्या तळात कोणतेही दगडाचे सोलिंग न करता तळातील भागात काँक्रिट पाण्यात ओतले जात आहे. गटारिवर टाकलेल्या स्लॅबला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहे.
सदर कामाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाचे पद्धतीचे चालू असलेले काम चांगल्या दर्जाचे करण्यात यावेत. तसेच भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेले हुताम्याच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्तंभाच्या जवळून गटारीचे काम चालू असुन स्तंभाचा मेन चौथरा (पाया) तोडण्यात आला आहे. या स्तंभाची उभारणी भारत सरकार द्वारा स्थापित 15 ऑगस्ट 1972 ते 14ऑगस्ट 1973 मध्ये स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. स्तंभावर भारतचे संविधान व स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या 17 हुतात्म्यांचे नाव कोरीव स्वरूपात आहेत.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात स्तंभाचे जतन व सुशोभीकरण करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर, रमेश राक्षे, अॅड. दिपक शेटे, अॅड राम भांगरे, अॅड. भाऊसाहेब वाळुंज, रामहारी तिकांडे, महेश नवले, माधवराव तिटमे, दत्ता ताजणे, कैलास तळेकर, धनंजय संत, राम रुद्रे, नरेंद्र देशमुख आदींचे नावे आहेत.