![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/05/smbt-1024x768.jpg)
उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पेटंट मिळवणारे महाविद्यालय
आणखी ८ पेटंटवर होणार लवकरच शिक्कामोर्तब
आणखी ८ पेटंट लवकरच मान्यता
सध्याच्या पेटंटला मान्यता मिळाली असून आणखी ८ पेटंट रजिस्टर झालेले असून लवकरच या पेटंटला मान्यता मिळेल अशी आशा आहे. १८ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय करार औषधनिर्माण शास्र महाविद्यालयाचे झाले असून नियमित प्रदेशातील व्याख्याते याठिकाणी येत असतात. दरवर्षी अंतराष्ट्रीय स्तरावरील पारंपारिक औषधांवर आयोजित आयसीटीएम कॉन्फरन्स याठिकाणी होत असून सलग पाच वर्षांपासून उदंड असा प्रतिसाद मिळाला आहे.
डॉ. योगेश उशीर
प्राचार्य, एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी
उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय
एसएमबीटी औषधनिर्माण शास्र महाविद्यालयात सर्वाधिक संशोधन गेल्या काही वर्षांत झाले आहे. १३ देश आणि विदेशातील पेटंटसह आज महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रात अग्रस्थानी आहे. येथील अनेक विद्यार्थी आज परदेशात नामांकित ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहेत. येथील अनेक विद्यार्थांची परदेशवारी झाली असून त्यांनी नामांकित विद्यापीठांत पेपर प्रेझेन्टेशन केलेले आहे.
नाशिक | दि. २४ प्रतिनिधी
एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल १३ पेटंटला पेटंट कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील पेटंट प्राप्त करणारे एसएमबीटीचे कॉलेज ऑफ फार्मसी हे एकमेव महाविद्यालय बनले आहे. विशेष म्हणजे, आणखी आठ पेटंटची नोंदणी पूर्ण झाली असून लवकरच यादेखील पेटंटसला मान्यता मिळेल असा विश्वास महाविद्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील हे पेटंट येणाऱ्या काळात सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पेटंट कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर यांनी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी शैक्षणिक संकुलात विविध अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. औषधनिर्माण शास्र महाविद्यालयांत वेगवेगळे संशोधन करण्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना यश आले आहे. एखाद्या रुग्णाने वेगवेगळ्या गोळ्या आणि औषधे घेतल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर आर्सेनिक आणि कॅडमियम मानवी आरोग्यासाठी कमी प्रमाणात हानिकारक असू शकतात याबाबत अभ्यासपूर्ण परीक्षण करून एक पेटंट डिझाईन साकारण्यात आले या डिझाईनला देखील पेटंट मिळाले आहे.
यासोबतच आरोग्याचे संरक्षण व स्वयंचलित औषधाचे डोस लागू करणारे एक उपक्रम विकसित करण्यात आले. यादेखील डिझाईनला पेटंट मान्यता देण्यात आली आहे.
तसेच डिजिटल आणि पोर्टेबल वेदनाशामक उपकरण डिझाईन करण्यात आले असून हॉट प्लेट अनाल्जेसिओमीटर वापरले जाते. यासाठीदेखील नुकतेच पेटंटची मान्यता मिळाली. पशुपालन प्रक्रियेत वेदना प्राप्ती आणि वेदना व्यवस्थापन मदत करण्यासाठी वापरला जातो हे डिझाईन अधिक प्रभावी ठरेल असे म्हटले जात आहे. हॉट प्लेट अनाल्जेसिओमीटरचा वापर शैक्षणिक संस्थांमध्ये महत्वाचा मानला जातो असेही तज्ञ सांगतात.
खाद्यपदार्थ्यांची गुणवत्ता आणि सुरक्षा चाचणी करण्यासाठी इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी डिव्हाइसचा वापर केला जातो याबाबतचेही एक पेटंट एसएमबीटीच्या औषधनिर्माण शास्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. दुसरीकडे नायसोम्स नावाचे एक डिव्हाईस पेटंट तयार करण्यात आले असून विविध आजारांवरील उपचारासाठी एक महत्वपूर्ण औषधी तंत्रज्ञान असल्याचे सांगितले जाते. स्मार्ट आणि पोर्टेबल टेलफ्लिक वेदनाशामक उपकरणाचे पेटंट मानवी शरीरात वेदना व संवेदनशीलता मोजण्यासाठी वापरले जाते यासही मान्यता मिळाल्यामुळे अनेक रुग्णांच्या वेदना कमी करण्यास भविष्यात मदत होईल सांगितले जात आहे.
गेल्या वर्षी जायफळापासून वेदनाशामक जेलचे पेटंट मिळाले आहे. हा जेल सर्वसामान्य रुग्णांना अतिशय माफक दरात उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे मिश्रानांच्या विलगीकरणासाठी वापरण्यात येणारे तिहेरी उर्ध्वपातन यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे संशोधन औषध, खाद्य उत्पादन आणि अन्य वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरले जाऊ शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पोलीअनिलीन आणि पोलीस्टर, ननोकाम्पोझीट विश्लेषण उपकरण. फार्मास्युटिकल उत्पादनांमध्ये या धातूचा शोध घेण्यासाठी मदत होते मानवी जिवनावर विषबाधा किवा आरोग्यावर प्रतिकुल परिणाम टाळण्यासाठी मदत होते. हे उपकरण वापरल्याने मानवी जीवणावर होणारा धोका कमी होतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये लहान मुले, गर्भवती महिला किवा वृद्ध व्यक्ती यांचे संरक्षण होईल असे सांगितले जात आहे.
![](http://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/05/darshan-4-1024x1003.jpg)