अमोल खताळ यांची संगमनेर भाजप विधानसभा प्रमुखपदी निवड

0
1250

भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – संगमनेर येथील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांची संगमनेर भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अमोल खताळ यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्य मंत्री  भागवत कराड, दादा भुसे,  ना. शंभूराजे देसाई, खा. सदाशिव लोखंडे, आ. आशीष देशमुख, माजी आ. वैभवराव पिचड, जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह उत्तर नगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  या निवडीबद्दल खताळ यांचे ना. राधाकृष्ण विखे पा., खा. डॉ. सुजय विखे, सौ.शालिनीताई विखे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here