दुर्लक्षित उमेदवारीच ठरली लक्षवेधी

0
1327

रूपवतेंच्या सकारात्मक व विकासात्मक भुमिकेला सर्वच स्थरातील मतदारांकडून पाठिंबा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शिर्डी लोकसभा या राखीव मतदारसंघातून आजी माजी खासदार अनुक्रमे महायुती व महाविकास आघाडीकडून मैदानात आहे. सुरवातीला या दोन्ही उमेदवारांमध्येच लढाई रंगणार अशी जोरदार चर्चा होती मात्र सुरवातीला दुर्लक्षित असणार्‍या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचीच उमेदवारी या मतदारसंघातून लक्षवेधी ठरताना दिसत आहे.
काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर उत्कर्षा रुपवते या विसंबून होत्या परंतु आघाडीच्या राजकारणात ही जागा शिवसेना (ठाकरे) यांच्या गटाला गेल्याने रुपवते यांनी शेवटच्या क्षणी वंचितची उमेदवारी घेतली. या मतदारसंघात वंचितचे संघटन नसताना व कार्यकर्त्यांची तसेच आर्थिक रसद नसताना देखील उत्कर्षा रुपवते यांनी अल्पावधीतच हा मतदारसंघ पिंजून काढत मतदारांचे लक्ष वेधून घेतले. खेडोपाडी, वाडीवस्त्यावर आपली प्रचार यंत्रणा पोहचवली व आपली उमेदवारी का आणि कशासाठी हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही उमेदवार अनुभवी असले तरी त्यातील एक दहा वर्षांत मतदारसंघात फिरकला नाही तर दुसरा वारंवार दलबदल करीत रिटायर झाला आहे. या दोन्ही उमेदवारांवर भ्रष्टाचारासह गद्दारी, धोकाधडी असे अनेक आरोप आहेत. एक जण केवळ मोदींच्या नावावर मते मागत आहे तर दुसरा जुन्या चुकीची माफी मागत पुन्हा एक संधी मागत आहे. अशा परिस्थितीत मतदारांना पर्याय हवा होता. आणि उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने तो पर्याय मिळाला आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी सर्व पक्षीय त्याचबरोबर सर्व समाज घटकातील तरुण मोठ्या संख्येने उत्फुर्तपणे त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहे. रुपवते या जरी वंचितच्या उमेदवार असल्यातरी त्यांना सामाजिक, राजकीय वारसा आहे, सर्व पक्षात त्यांचे स्नेहाचे संबंध आहे. उच्च शिक्षित तरुण असल्याने व आपली उमेदवारी ही कुणाच्या विरोधात नाही किंवा कुणाच्या पराभवासाठी किंवा विजयासाठी नसून या मतदारसंघाच्या विकासासाठी, येथील गोरगरीब, वंचित, शिक्षित तरुणांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविण्यासाठी आहे. मतदारांना केवळ आश्वासन देऊन पाठ फिरवणार नसून शेवट पर्यंत मतदारांच्या विश्वासा पात्र ठरू. त्यांच्या या सकारात्मक व विकासात्मक भुमिकेला सर्वच स्थरातील मतदारांकडून पाठिंबा मिळत आहे.
वंचित ही भाजपची बी टीम आहे असा आरोप वारंवार त्यांच्यावर होत असतांना या आरोपाला त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या भुुुमिका मतदारांना पसंत पडत असून व दोन्ही आजी-माजी खासदार उमेदवार यांच्यापेक्षा रूपवते यांची छाप प्रभावीपणे पडत असल्याने खर्‍या अर्थाने या मतदार संघाला पुन्हा एकदा एक चांगला उमेदवार मिळाल्याची चर्चा मतदारांमध्ये होतांना दिसत आहे. वंचितच्या या दुर्लक्षित व आत्ताच्या लक्षवेधी उमेदवारीने महायुतीला फायदा तर महाआघाडीला तोटा होणार असल्याचे बोलले जात असले तरी ही निवडणूक आपण वंचित घटकाच्या विकासासाठी व त्यांच्या हक्काचा लोकप्रतिनिधी संसदेत जाण्यासाठी आणि विजयासाठीच लढत असल्याचा दावा रूपवते या करत आहे. त्यामुळे सुरूवातीला दुरंगी व नंतर तिरंगी वाटणारी ही निवडणूक हळूहळू पुन्हा दुरंगी व त्यानंतर एकरंगी होण्याची शक्यता मतदार व्यक्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here