पागिरवाडीत शॉर्ट सर्किटने घराला आग

0
1274

गॅस टाकीचा स्फोट

पिं.नाकविंदा/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील पागिरवाडी, मुथाळणे येथील पोपट बंडू हळकुंडे यांचे राहत्या घराला मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागून गॅस टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही कळण्याच्या आत घराला लागलेल्या आगीने पूर्ण घर जळून खाक झाले. यावेळी हळकुंडे कुटुंब उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराच्या बाहेर अंगणात झोपलेले होते. गॅस टाकीच्या स्फोटाच्या आवाजाने सर्व कुटुंब झोपेतून जागे झाले. शेजारी असलेले नागरीक व अजूबाजूच्या नागरीकांना घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. घरातील बांधलेली जनावरे या लागलेल्या आगीतून अत्यंत शिताफीने बाहेर काढण्यात आली. मात्र घराला लागलेली आग इतकी प्रचंड मोठी होती की, आगीत पूर्ण घर जळून खाक झाले.
अकोले येथून अग्निशामक बंब बोलवण्यात आला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अकोले पोलीस पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाने सकाळी घटनेचा पंचनामा केला. मात्र शासकीय मदत जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. माणुसकीच्या नात्याने हळकुंडे कुटुंबाला मदत करण्यासाठी वस्तू, धान्य, कपडे, रोख स्वरूपात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सदर कुटूंब गरीब असून या आगीमुळे संपूर्ण कुटूंब उघड्यावर पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here