ओढूनिया मारूतीचा रथ, भगिणी हर्षित झाल्या

९५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

हनुमान जयंती संगमनेरमध्ये धुमधडाक्यात साजरी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – स्वातंत्र्यपुर्वी 95 वर्षांचा तोच जोष, तोच उत्साह आणि तीच उत्कंठा आजही कायम ठेवत हनुमान जयंती निमित्त हनुमानाचा रथ महिला रणरागिणींनी ओढून संगमनेरची ही अखंड परंपरा कायम जपली. शहरातील चंद्रशेखर चौकातील मोठे मारूती मंदीरातील हनुमान रथ ओढण्यासाठी शहरातील महिला भगिणी मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. परंपरेनुसार पोलीस दलाने आणलेला भगवा ध्वज रथावर फडकविल्यानंतर संघटीत झालेल्या महिलांनी हा रथ ओढत एकच जल्लोष साजरा केला आणि या मिरवणुकीला सुरूवात झाली.


संगमनेरकरांच्या हृदयाशी अत्यंत जवळ असलेला हा उत्सव म्हणजे एक सोनेरी पान आहे. हनुमान जयंती हा रथ आणि महिला यांचा एक संघर्षाचा इतिहास आहे. अपवाद वगळता दरवर्षी हा संघर्षाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 95 वर्षांची परंपरा, रथाचे केलेल नुतनीकरण व या उत्साहाला नव्याने चढलेला साज यामुळे यावर्षी देखील हजारो महिला भगिणी या उत्साहात सहभागी झाल्या होत्या. सध्या उन्हाचा पारा वाढल्याने सकाळी 8 वाजेच्या सुमारास पारंपारिक पुजाविधी झाल्यानंतर या रथाची मिरवणूक सुरू झाली. शहर पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी शहर पोलीस ठाण्यापासून भगवा ध्वज मिरवणूकीने इथपर्यंत आणला. विधिवत या ध्वजाचे रथावर ध्वजारोहण करण्यात आले. आणि पवनपुत्र हनुमान की जय, बोल बजरंग बली की जय, असे म्हणत असंख्य महिलांनी हा रथ ओढायला सुरूवात केली. बघता बघता हा रथ पुढे सरकू लागला आणि महिलांमध्ये एकच शक्ती आणि जल्लोष संचारला. रूढी परंपरेनुसार रंगारगल्ली सोमेश्वर मंदिरापर्यंत या रथाचे सारथ्य महिला करता व त्यानंतर महिला पुरूष एकत्रीतपणे नगरपालीका, मेनरोड, नेहरूचौक मार्गे पुन्हा चंद्रशेखर चौक या ठिकाणी मिरवणूकीची सांगता होते.
संगमनेरचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सासरी गेलेल्या माहेरवासीन पुन्हा या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात तर हा सोहळा पाहण्यासाठी पुणे, मुंबईतूनही अनेक भाविक येत असतात. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा ऐतिहासीक सोहळा पाहण्यासाठी संगमनेरकर नागरीक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होतात. ढोल -ताशांच्या गजरात ही मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडली. दरम्यान हनुमान जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनानेही आपली भक्ती जपत चोख बंदोबस्त ठेवला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख