इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा
कर्जबुडव्यांचा व्हाईट कॉलर थाट फक्त दिखाव्यापुरताच
युवावार्ता (प्रतिनिधी) अहमदनगर
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आता न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या निकालाकडे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यासह १७ जणांना दोषी ठरवले होते. आता या प्रकरणी न्यायालयाने अटकेत असलेल्या ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफरे हिच्यासह तीन संचालकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. नाईकवाडी यांनी बुधवारी हा निकाल दिला.
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या १७ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी सर्व आरोपींना दोषी धरण्यात आलेले होते.
यामध्ये आता अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे या पाच आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
सरकारी पक्षाच्या वतीने वसंत ढगे यांनी, ठेविदारांच्या वतीने अनिता दिघे यांनी तर अवसायिकाच्या वतीने ऍडव्होकेट सुरेश लगड यांनी न्यायालयात बाजू मांडली.
कोट्यवधींचा खर्च पतसंस्थेतून?
ज्ञानदेव वाफारे याने पतसंस्थेमधून कोट्यवधी रुपये आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे समोर आले होते. यात त्याने या पैशांतून महागडी कार खरेदी केली. तसेच, त्याने घर, किराणा, वीज बिल आदी अनेक खर्चही पतसंस्थेतूनच केल्याचे चौकशी समोर आले होते.
‘हे’ आहेत आरोपी
ज्ञानदेव वाफारे, सुजाता वाफारे,साहेबराव भालचंद्र भालेराव, रवींद्र शिंदे, संजय चंपालाल बोरा (जन्मठेप), सुधाकर थोरात, भाऊसाहेब झावरे, दिनकर ठुबे, राजे हसन अमीर, बबन झावरे, हरिश्चचंद लोंढे, अनुप पारेख, सुधाकर सुंबे, गोपीनाथ सुंबे आदी दोषी आरोपींची नावे आहेत.