डॉ. सागर गोपाळे यांच्या एक्स्पर्ट डेंटल क्लिनिकमध्ये सुविधा
Artificial intellegence (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग आता सर्वच क्षेत्रात होऊ लागला आहे.आता तर संगमनेरमध्ये तुमच्या दातांच्या तपासणीसाठी AI रोबोट तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. ‘ दात वाचवणारे डॉक्टर ‘ या ब्रीदवाक्यानुसार डॉ. सागर गोपाळे हे मागील 17 वर्षे दातांच्या आरोग्याविषयी जनजागृती करत आहेत. शहरी भागातील लोकांप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांनीही दात दुखायला लागल्यावर लगेच काढून टाकण्यापेक्षा दात वाचवण्याचा विचार करायला हवा.आजच्या डिजिटल युगात अनेक अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. त्याद्वारे बहुतांश लोकांचे दात न काढता दातांचे दुखणे बरे होऊ शकते. असा विश्वास देत डॉ. सागर गोपाळे यांनी Xpert डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून अनेक लोकांच्या दातांच्या आजारावर उपचार केले. त्यासाठी अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स व काही सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स Xpert डेंटल क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे म्हातारपणातही नैसर्गिक दातांच्या साहाय्याने जीवन अधिक सोयीस्कर व आनंदी करणे शक्य झाले. त्यामुळेच ‘ दात वाचवणारे डॉक्टर ‘ ही Xpert डेंटल क्लिनिकची टॅगलाईन आता तुमच्या परिचयाची झाली असेल.
त्याचबरोबर सौंदर्यवृद्धीसाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी देखील अनेक कॉस्मेटिक उपचार सुविधा Xpert डेंटल क्लिनिक मध्ये उपलब्ध आहेत.दंतरोग व उपचार या क्षेत्रात काहीतरी नवनवीन उपक्रम Xpert डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून डॉ. सागर गोपाळे नेहमी करत असतात. अनेकदा दुर्गम भागांत किंवा शाळांमध्ये दंतरोग तपासणी करताना डॉक्टरांचे मनुष्यबळ व वेळ कमी पडतो. तसेच त्यावेळी आवश्यक काळजी किंवा उपचार सांगूनही मुलांना ते पालकांना सांगता येत नाही. आता या AI रोबोट तंत्रज्ञानामुळे तपासणीनंतर पाच मिनिटांत रुग्णांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर दातांचा फोटो तसेच आवश्यक उपचार उपलब्ध होईल असे डॉ.सागर गोपाळे यांनी सांगितले. ही सुविधा मोफत उपलब्ध असून याचा सर्व विद्यालय – महाविद्यालय यांनी घ्यावा , तसेच पन्नासपेक्षा जास्त लोक असतील अशा हाऊसिंग सोसायटी , समाजसेवी संस्था , विविध संस्था यांनीही या उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन डॉ. सागर गोपाळे यांनी केले.