आगीत लाखोंचे कपडे व फर्निचर जळाले
आगीत सुमारे 25 ते 30 लाखांचे नुकसान
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहरातील नवीन अकोले रोडवरील प्रसिद्ध दुनियादारी कलेक्शन न्ड स्पोर्ट्स या कापड दुकानास शार्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आज गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास लागलेल्या या आगीत दुकानातील महागडे कपडे, फर्निचर जळून, इलेक्ट्रीक साहित्य जळून व कपडे भिजून सुमारे 25 ते 30 लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र अग्निशामक दलाने तातडीने धाव घेतल्याने मोठी हानी टळली.
याबाबत माहिती अशी की, येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल वर्पे यांच्या मालकीचे दुनियादारी कलेक्शन अॅन्ड स्पोर्ट्स हे कापड दुकान आहे. आज सकाळी हे दुकान बंद असताना अचानक या दुकानातून धूर निघू लागला. या धूराने हळूहळू पेट घेतल्याने दुकानातील कपड्यांनी पेट घेतला. दरम्यान दुकान बाहेरून बंद असल्याने आग भडकण्याची मोठी शक्यता होती. परंतु दुकानाचे शटर लवकर उघडण्यात आले तसेच अग्निशामक दलही घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने या आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. परंतु आग व धूर यामुळे दुकानाती कपडे, फर्निचर, छताचे मोठे नुकसान झाले. अग्नीशामक दलाच्या मारलेल्या पाण्यामुळेही मोठ्या प्रमाणावर कपडे खराब झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह
याबाबत ङ्काहिती अशी की, येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल वर्पे यांच्या ङ्कालकीचे दुनियादारी कलेक्शन अॅन्ड स्पोर्ट्स हे कापड दुकान आहे. आज सकाळी हे दुकान बंद असताना अचानक या दुकानातून धूर निघू लागला. या धूराने हळूहळू पेट घेतल्याने दुकानातील कपड्यांनी पेट घेतला. दरम्यान दुकान बाहेरून बंद असल्याने आग भडकण्याची ङ्कोठी शक्यता होती. परंतु दुकानाचे शटर लवकर उघडण्यात आले तसेच अग्निशाङ्कक दलही घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने या आगीवर लवकर नियंत्रण ङ्किळविण्यात यश ङ्किळाले. परंतु आग व धूर याङ्कुळे दुकानाती कपडे, ङ्खर्निचर, छताचे ङ्कोठे नुकसान झाले. अग्नीशाङ्कक दलाच्ङ्मा ङ्कारलेल्ङ्मा पाण्ङ्माङ्कुळेही ङ्कोठ्या प्रङ्काणावर कपडे खराब झाले. शॉर्ट सर्किटङ्कुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.