सर्व समाज घटकांच्या भक्कम पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात – कपिल पवार

0
281

राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ प्रभागांत सक्षम व विकासाभिमुख उमेदवार केले उभे

संगमनेर (प्रतिनिधी )-
संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभावीपणे मैदानात उतरला असून शहरातील सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा पक्षाला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्ष असूनही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील नऊ प्रभागात मजबूत, प्रामाणिक व विकासाभिमुख उमेदवार उभे केले आहेत. प्रचारादरम्यान उमेदवारांना मिळणार्‍या प्रतिसादाच्या जोरावर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भरीव यश मिळवून नगरपालिकेत दमदार एन्ट्री करेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी व्यक्त केला.

कपिल पवार म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गतिमान नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात प्रभावीपणे कार्यरत असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधणे हेच पक्षाचे धोरण आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन, त्यांना न्याय व मानमरातब देत पक्ष सतत लोकसेवेत अग्रभागी राहिला आहे.
महिलांसाठी सुरक्षित वातावरण व कल्याणकारी योजना, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी पुढे राहिली आहे. याच ध्येयाने पक्षाने या निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार मैदानात उतरवले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार –

मागील काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे शिलेदार नगरपालिकेत विरोधी पक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करत नागरिकांचे प्रश्न सातत्याने मांडत राहिले. निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया आहे. जनतेने दिलेला विश्वास शिलेदार नक्कीच जपतील, दिलेला शब्द पाळतील आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवून दिलासा देण्याचे काम प्राधान्याने करतील, असे मत कपिल पवार यांनी व्यक्त केले.
संगमनेरच्या विकासासाठी, युवकांसाठी संधीसाठी, महिलांसाठी सुरक्षित वातावरणासाठी आणि सर्वसामान्यांच्या सभ्य जीवनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here