
साई स्टडी सर्कलमुळे अनेकांना मिळाल्या यशाच्या वाटा
संगमनेर (दैनिक युवावार्ता) – संगमनेरच्या मातीत घडलेला आणि विजयाच्या शिखरावर पोहोचलेला अविष्कार राणे हा युवक आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. अवघ्या २४ व्या वर्षी अविष्कारने युनियन बँक ऑफ इंडिया वर्ग १चे अधिकारी पद मिळवले असून, या यशाने संपूर्ण संगमनेरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.अविष्काराच्या यशामागे आहे त्याची अढळ जिद्द आणि चिकाटी आहेच सोबतच येथील श्रीनिवास भंडारी व दर्शन भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली साई स्टडी सर्कलमध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्रशस्त अभ्यासिका व त्यात शांतता व प्रसन्न वातावरण, २४ तास वायफाय, स्वच्छ पाणी, स्पर्धा परीक्षेचे पुस्तके, वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत.

आविष्कारच्या कुटुंबाचा छोटा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय, आई गृहिणी आणि एकूण बेताची आर्थिक परिस्थिती असून, आपण काहितरी करू शकतो, परिस्थितीवर मात करू शकतो असा दृढ विश्वास आविष्कार मध्ये होता. एमएससी करत असताना त्याची स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळून हा अविष्कार घडवून आणला आहे. या यशाबद्दल श्रीनिवास भंडारी, दर्शन भंडारी, सौ. राजश्री भंडारी यांनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. अविष्कार हा संगमनेरमधील सराफ विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत राणे आणि सुनील राणे यांचा पुतण्या आहेत. त्याच्या या यशाबद्दल युनियन बँकचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी तथा अमृतवाहिनी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, दुध उत्पादक संघाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुजित खिलारी, ॲड. अनिल भांगरे, ॲड. प्रमोद कडलग, राजेंद्र बोरुडे आदि मान्यवरांनी त्याचा सत्कार करत कौतुकाचा वर्षाव केला.