आनंदगड शैक्षणिक संकुलाचा अभिमान
शुटिंग रेंज १० मीटर एअर रायफल शूटिंग या राष्ट्रीय स्पर्धा नुकत्याच मध्येप्रदेश मधील भोपाळ येथे नुकत्याच संपन्न झाल्या
या राष्ट्रीय स्पर्धेत धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आनंदगड वीरगाव येथील इयत्ता बारावी सायन्स मध्ये शिकणारी कु. श्रद्धा अशोक वाळुंज हिने सहभागी होत रायफल शूटिंग मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली तिची इंडिया टिम ट्रायल १ आणि २ साठी युथ, ज्युनिअर आणि सिनियर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन (ISSF) कॅटेगरी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली
आतापर्यंत कला ,क्रीडा, संस्कृतीक, शैक्षणिक क्षेत्रात आनंदगड शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता व कौशल्यांचा जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपला दब- दबा निर्माण केला आहे श्रद्धा च्या यशाने यामध्ये आणखी भर पडली आहे यशस्वी श्रद्धा चे
आनंदगड शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे संस्थापक सचिव डॉ.अनिल रहाणे, संचालिका सौ.सुप्रिया वाकचौरे, सौ.गीता राहणे, प्राचार्य किरण चौधरी, रवींद्र आंबरे प्रा.संदीप थोरात सौ.अलका आहेर प्रियांका सोनवणे अंजीरा देशमुख यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थिनींचे परिसरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.