समनापुर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरयांचे भव्य स्मारक व्हावे- आ. सत्यजित तांबे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जात आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध गावांशी त्यांचा त्या काळात मोठा संबंध आला असून त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणादायी राहावी याकरता समनापुर येथे त्यांचे भव्य स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी आ. सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत बोलताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा सततच्या विकास कामातून वैभवशाली बनवला आहे. या तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा असून तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळख असलेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संगमनेर तालुक्यातील अनेक गावांशी त्या काळात संबंध आला आहे. समनापुर या ठिकाणी त्यांच्या काळातील ऐतिहासिक बाराव असून ही बारवाची जागा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मी सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या नावे करून घेतली आहे.
त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी बारव निर्माण केल्या आहेत. आजही त्या बारव सुस्थितीत असून आजच्या पिढीला त्यांच्या महान कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि या ऐतिहासिक ठिकाणांचे संवर्धन व जतन करण्यासाठी समनापुर या गावांमध्ये त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी सर्वांची मागणी आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक होण्यासाठी विशेष बाब म्हणून जिल्हा नियोजन अथवा कोणत्याही उचित निधीतून एक कोटी रुपयांचा निधी प्रस्थापित करावा व तातडीने हे भव्य स्मारक निर्माण करावी अशी आग्रही मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे. पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी यांचे समनापुर मध्ये स्मारक होण्यासाठी केलेल्या मागणीचे समनापुर ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णकृती पुतळा होणार
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या हायटेक बसस्थानका समोरील दर्शनी भागामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्‍वारूढ पुतळा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्या असलेल्या पुतळ्याच्या जागेवर त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती ही आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

कापूस खरेदीसाठी अटी शिथील कराव्यात

केंद्र सरकारने कापूस खरेदीला प्रती क्विंटल 7 हजार 521 रुपयाचा हमी भाव दिला आहे. परंतू भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) जाचक अटींमुळे कापूस उत्पादक त्याचा लाभ मिळत नाही. सीसीआय 12% पेक्षा जास्त ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही. त्यामुळे ही अट शिथील करून 18% करण्यात यावी आणि कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख