योजनेला जलसंधारण मंहामंडळ छत्रपती संभाजी नगर यांचे प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध
योजनेची वैशिष्ट्ये
1) 34 किमी लांबी, 2) आरक्षित पाणी – 105 दलघफू, 3) सिंचनाचा लाभ – 300 हेक्टर, 4) विहिरींना लाभ – 400, 5) पाणीविसर्ग – 70 क्युसेक
लाभार्थी गावे – कुंदेवाडी, गुरेवाडी, हाबेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, खंबाळे, मर्हळ खुर्द, मर्हळ बुद्रुक, सुरेगाव, भोकणी, दोडी, मानोरी , कणकोरी, निर्हाळे, फुलेनगर, गोरेवाडी, कहांडळवाडी, मलढोण, सायाळे आणि देवकौठ इ.
यशस्वी जलसंधारण!
कुंदेवाडी ते सायाळे योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत चांगल्या दाबाने पोहोचले ही अत्यंत समाधानाची बाब आहे. अशा पाणीरुपी नवसंजिवनी देणार्या योजना राबविण्याचा प्रयत्न यापुढे मृद व जलसंधारण विभागाकडून करण्यात येईल. हरिभाऊ गिते प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, नाशिक
चाचणी झाली पुर्ण
कुंदेवाडी ते सायाळे योजनेची चाचणी यशस्वी ठरली आहे. देवकौठे गावापर्यंत पाणी पोहोचले असून योजनेच्या त्रुटी शोधून त्यात दुरुस्ती करण्यात येईल.लाभार्थी गावांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब डोळसे, जलसंधारण अधिकारी
युवावार्ता (प्रतिनिधी)
देवकौठे -संगमनेर तालुकातील देवकोठै शिवारात देवनदी वरुन सोडण्यात आलेले पुर पाणी 4 दिवसात शेवटच्या टोंकापर्यत पोहचले. पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या पुरचारी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असुन त्याची चाचणी घेण्यात येत आहे. या योजनेला जलसंधारण मंहामंडळ छत्रपती संभाजी नगर यांचे प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन महाराष्ट जलसंधारण विभागाची ही पहीली योजना आहे.
मृद व जलसंधारण विभागामार्फत झालेल्या योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे समगनेर तालुक्याचे काही भाग व सिन्नर तालुक्यातील पूर्वभागात दुष्काळ हा कायम पाचवीला पुजलेला आहे. हा दुष्काळ दूर करण्यास ही योजना जणू वरदानच ठरत आहे. दि.27 रोजी योजनेचे शेवटचे टोक देवकौठे येथे पाणीपुजन करण्यात आले. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, कंत्राटदार किरण पाटील यांचे गावकर्यांमार्फत स्वागत करण्यात आले. तसेच कायमचा पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू अशा एकमुखी प्रतिक्रिया देण्यात आल्या.