‘शुभकार्य तुमचे, व्यवस्थापन आमचे ’ या घोषवाक्याचा उपयोग करून संगमनेर शहराबरोबरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये व्यवसायाची छाप
संगमनेरच्या उमद्या तरूणाने हॉटेल मॅनेजमेटंमधील उच्च शिक्षण घेतले. संगमनेर, अकोले, लोणी, शिर्डी याचबरोबर नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी केटरींग (फुड), डेकोरेशन आणि इन्टरटेन्मेंट सुविधा ‘द रॉयल इव्हेंट’ या फर्मअंतर्गत सुरू केली. अद्ययावत सुविधा, नवनवीन तसेच पारंपारिक पदार्थ, डेकोरेशनचे असंख्य पर्याय, कष्टाळू आणि उच्चशिक्षित मनुष्यबळ, टेक्नॉलॉजीचा वापर करून अमोल गुंजाळ नगर जिल्ह्यामध्ये इव्हेंट क्षेत्रात अग्रेसर आहेत. नव्यानेच सावेडी, अहमदनगर तर मुंबई हायवे, नाशिक येथे द रॉयल इव्हेंटस् च्या ब्रँच सुरू झाल्या आहेत ही भूषणावह बाब आहे.
मानवाच्या मूलभूत गरजा लक्षात घेता अन्न ही मूलभूत गरज आहे. असे म्हणतात की जसे अन्न ग्रहण कराल तसा त्याचा आपल्या मनावर, शरीरावर परिणाम होत असतो. जसे कराल ग्रहण तसे होईल मन या वाक्प्रचाराप्रमाणे आजकाल लग्न, वाढदिवस, शुभारंभ यात प्रामुख्याने चांगल्या जेवणाचा विचार केला जातो. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि कोणत्याही शुभ कार्यक्रमात जेवणाचा मेन्यू, त्यासोबत सजावट या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात. सजावट मनोरंजन आणि जेवण हेच कोणत्याही कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरते. याच व्यवसायात प्रामुख्याने नाव घेतलं जातं द रॉयल इव्हेंट्स यांच.
संगमनेरमध्ये ‘द रॉयल इव्हेंट्स’ म्हणून व्यवसायात कार्यरत असणारे अमोल विठ्ठल गुंजाळ यांनी व्यवसायाची सुरुवात 2018 मध्ये केली. साधारणतः गेल्या पाच वर्षात गुंजाळ यांनी आपल्या व्यवसायात नाव कमावले. ‘शुभकार्य तुमचे, व्यवस्थापन आमचे ’ या घोषवाक्याचा उपयोग करून त्यांनी संगमनेर शहराबरोबरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या व्यवसायाची छाप पाडली आहे.
व्यवसाय म्हटलं की त्यात चढउतार हा राहणारच पण व्यवसायातील सर्व बारकावे लक्षात येण्यासाठी व्यवसायाचे ज्ञान असणे आवश्यक असते. यासाठी अमोल विठ्ठल गुंजाळ BHTMS ही व्यवस्थापन शास्त्राची पदवी व DHMCT ही पदवीका घेऊन आपल्या व्यवसायात त्याचा उपयोग केला. व्यवसाय म्हटला की स्पर्धा असते मात्र या स्पर्धेतही नंबर 1 नाव म्हणजे ‘द रॉयल इव्हेंट्स’. रॉयल इव्हेंटस् हा व्यवसाय प्रामुख्याने संगमनेर, लोणी, शिर्डी या शहरात चालतो. ते त्यांच्या केटरिंग व्यवसायात अस्सल भारतीय मसाले वापरतात. रुचकर जेवण बनवून देण्याला ते नेहमीच प्राधान्य देतात. श्री. गुंजाळ यांचा या व्यवसायात ऐकून वीस वर्षाचा अनुभव असून इंस्टाग्राम वेडींगमुळे नवीन पिढीला अधिकाधिक सुविधा हव्या आहेत. त्या सुविधा पूर्ण करण्याचे काम अमोल गुंजाळ करतात. लग्नामध्ये तसेच पूर्वीसारख्या गर्दीच्या लग्नापेक्षा कमी लोकांमध्ये पण अधिकाधिक सुंदर डेकोरेशन आणि जेवणाचे विविध प्रकारचे मेनू हवे असतात. या सर्व गोष्टीचा विचार करता भविष्यात त्यांनी आपला व्यवसाय पुढे चालविण्यासाठी व जास्तीत जास्त व्यवसायात वाव मिळण्यासाठी त्यांनी ’लग्न करा आज, पैसे द्या हप्त्याने (EMI) या स्कीमचा वापर करून त्यांच्या व्यवसायात ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत होते आहे.
संगमनेरमध्ये द रॉयल इव्हेंट्स या नावाने प्रसिद्ध असलेले अमोल विठ्ठल गुंजाळ यांचे व्यवसायाचे कार्यालय G. 29 टॉप टेन इम्पेरियल, हॉटेल पंचवटी जवळ आहे. अमोल गुंजाळ यांच्या यशाचे गमक म्हणजे त्यांची स्वतःची मेहनत, व्यवसायात टिकून राहण्याची जिद्द व सहकार्यांची मदत. ‘द रॉयल इव्हेंट्स’ प्रगतशील वाटचालीस स्नेहमय शुभेच्छा.