![](http://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/08/atc-top-1024x664.jpg)
सुर्यकांत बन्सीलाल दरडा नोकरीबरोबरच व्यवसायाचे स्वप्न बघितले. उच्चशिक्षित मुले शिरीष आणि अभय दरडा यांनी होलसेल किराणा व्यवसायाबरोबरच बिल्डिंग मटेरिअलचा व्यवसाय सुुरु केला.
बघता बघता ‘ अभय ट्रेडिंग कंपनी ’ चे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले. शशांक आणि आदित्य यांनी आता उद्योगात लक्ष घालताना लिडरशीप, क्वालिटी, प्रॉब्लेम सॉलव्हिंग, डिसीजन मेकींग, स्ट्रेटेजी या बिजनेस मॅनेजमेंट स्कील्सचा मेळ घातला आहे. मुलांनी केलेल्या प्रगतीचा त्यांना अतिशय अभिमान आहे.
संगमनेर (दैनिक युवावार्ता) – संगमनेर येथे सुर्यकांत बन्सीलाल दरडा यांनी विविध ठिकाणी नोकरी केली. नोकरी करत असताना कष्टाला त्यांनी नेहमी सर्वोच्च स्थान दिले. नोकरीने आपली आर्थिक प्रगती साध्य होणार नाही हे सुर्यकांत दरडा यांनी ओळखले. नोकरी करत असताना आपला एखादा व्यवसाय असावा असा विचार सतत त्यांच्या मनामध्ये येत होता. किराणा हे सर्वसामान्यांच्या अगदी जवळचा विषय. संगमनेरची बाजारपेठ मोठी. नोकरदार वर्ग शनिवारच्या दिवशी आणि गुरूवारच्या दिवशी बाजारपेठमध्ये खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करतो हे त्यांना माहित होते. ग्रामिण भागातील वर्गसुध्दा आठवडा बाजार आणि इतर दिवशी गर्दी करतो हे जाणल्यानंतर सुर्यकांत दरडा यांनी होलसेल किराणा व्यवसायात उतरण्याचे ठरविले. होलसेल किराणा करत असताना गुळ व शाबुदाणा या दोन खाद्यवस्तूंमध्ये त्यांनी मास्टरी केली. भारताच्या विविध राज्यांतून गुळ आणि शाबुदाणा खरेदी करून होलसेल किराणा व्यावसायात त्यांनी आपले नाव मोठे केले. आपले दोनही मुले शिरीष आणि अभय यांनी होलसेल किराणा व्यापारात आपले नाव कमवावे अशी त्यांची मनोमन इच्छा. वडिलांच्या इच्छेप्रमाणे शिरीष आणि अभय दरडा यांनी होलसेल किराणा व्यावसायाध्ये आपले मोठे नाव कमावले.
![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/08/atc-family-1024x387.jpg)
शिरीष आणि अभय दरडा हे किराणा व्यावसायामध्ये मोठे नाव संगमनेरच्या बाजारपेठेत झाले होते. होलसेल किराणा मालापेक्षा आपण वेगळ्या व्यवसायात यश मिळवावे असे दोघा भावांना सारखे वाटत होते. त्यांनी मनाशी चंग बांधला आणि नवीन व्यावसायासाठी अभ्यास सुरू केला. राज्यामधील कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग व्यवसायात वृध्दी होत असल्याने त्यांनी बिल्डिंग मटेरिअल व्यवसायात मुहूर्तमेढ रोवण्याची ठरविली. 2003 साली बिल्डिंग मटेरिअल विकण्यास दरडा बंधूंनी सुरूवात केली. सुरूवातीला प्लंबिंग क्षेत्रातील सुप्रीम या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशीप त्यांनी घेतली. व्यवसाय वाढत गेला आणि सुप्रिम कंपनीने आपल्या उत्पादनाचे संगमनेर तालुक्यातील अधिकृत वितरक म्हणून शिरीष आणि अभय दरडा यांचा गौरव केला. अधिकाधिक कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर त्यांना आज अहमदनगर जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते म्हणून परवानगी मिळाली आहे. ही संगमनेरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. ‘अभय ट्रेडिंग कंपनी’ संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये नावारूपाला आली आहे.
बाथ फिटींग, सॅनिटरी उत्पादने याची विक्री देखील सुरू केली.
![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/08/atc-i3-1024x326.jpg)
पुढील पिढी शशांक आणि आदित्य हे उच्चशिक्षित असून 2019 साली त्यांनी आपल्या वडिलांच्या व्यावसायात पदार्पण करण्याचे ठरविले. अनेक बदल त्यांनी या व्यवसायात आणले. बाथ फिटींग आणि सॅनिटरीमध्ये अनेक इंडियन आणि इंटरनॅशनल ब्रँड संगमनेरमध्ये आणण्याचे मोठे काम शशांक आणि आदित्य यांनी केले. 2023 साली 32,000 स्क्वे.फूट एवढ्या भव्य शोरूमचे निर्माण दर्डा ब्रदर्सने केले. 2024 मध्ये टाईल्स क्षेत्रात अभय ट्रेडिंगने पदार्पण केले आहे. अॅग्रीकल्चर, पीव्हीसी पाईप्स, बिल्डिंग मटेरिअल, फिल्ट्रेशन, हिटींग सोल्युशन, प्लंबिंग, बाथ फिटींग, सॅनिटरी आणि टाईल्स या प्रकारांमध्ये अभय ट्रेडिंग कंपनी काम करत आहे.
![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/08/atc-i2-1024x325.jpg)