यापूर्वीच्या लोकप्रतिनिधीने पठार भागातील प्रश्न न सोडवता जनतेला झुलवीत ठेवले
युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे इसले मात्र यापूर्वीच्या लोकप्रतिनिधीने पठार भागातील प्रश्न न सोडवता जनतेला झुलवीत ठेवले, यामुळे या बंचित भागाचा विकास होऊ शकला नाही. निवडणुकीत फक्त आश्वासनाच्या घोषणा देण्याचे काम केले. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. मात्र मी आमदार झाल्यानंतर दुसन्या दिवसापासून सातत्याने पठार भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या, सर्व सामान्य जनतेच्या सुख दुःखात सक्रिय राहिलो. महिन्यातून तीन-चार भेटी पठार भागात देत राहिलो. मात्र संपर्क वाढवल्याने लोकांच्या समस्या तक्रारी वाढत चालल्या, जसजशा समस्या प्रश्न सुटत गेल्या तसतशा लोकांच्या माझ्याकडून कामाबद्दलच्या अपेक्षा वाढत चालल्या.
आमदार कामे करतो, कोणालाही निधी देतो यामुळे कामासाठी राजूर व अकोले येथे जनता दरबार खचाखन भरू लागला. या संपर्कामुळेच फक पठार भागात विकासाचे साडे तिनशे कोटींचे कामे झाले. यामुळेच 28 गावातील लोक व सरपंच पदाधिकारी गांची माझ्याबदलनी सहानुभूती वाढली आहे. भविष्यात पठार भागातील महत्त्वाचा असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निश्थित प्रयत्न करीन, येथील प्रत्येकावर माझे प्रेम असून माझा जीव माझ्या मायबाप जनतेत असून जनतेचा सेवेकरी म्हणूनच काम करणार असल्याचे प्रतिपादन अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे व राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉ. किरणजी लहामटे यांनी पठार भागातील 28 गावातील मतदार कार्यकर्ते व पदाधिकारी महिला भगिनी पांना मार्गदर्शन करताना घारगाव येथे लक्ष्मी लॉन्स मध्ये झालेल्या प्रचार सभेत बोलताना व्यक केले.
अध्यक्षस्थानी सहकार नेते व अगस्ती कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकरहोते. यावेळी आमदार किरण लहामटे म्हणाले अकोले विधानसभा मतदारसंघात 2500 कोटींचा निधी गेल्या अडीच वर्षात मंजूर करून आणला. बरीच कामे पूर्ण झाली काही मंजूर असून ती भविष्यात पूर्ण होतील, त्यात प्रामुख्याने तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून लिंगदेव येथे एम. आय. डी. सी. मंजूर, अकोले येथे उपजिल्हा रुग्णालय, राजूर येथे शंबर बेडचे विशेष रुग्णालय मंजूर, अकोले बस स्थानक, अकोले बाजार तळ, तहसील कार्यालय इमारत, राजूर येथील कोर्टाची वास्तू, पिंपरकणे पुलाला निधी, 29 नवीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, 45 पाझर तलावांची व 72 साठवण बंधार्याची निर्मिती, तालुक्यातील राजुर, कोतुळ, अकोले शहरातील रस्ते, आदिवासी भागातील सीडी वर्क, कॉक्रिटीकरण रस्ते, पूल, वाचनालय, अकरा रुग्णवाहिका, जिल्हा परिषद शाळा नवीन वर्ग खोल्या इमारती, मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत, मंदिरांचे सभामंडप, 25 बुद्ध विहारांची उभारणी, कब्रस्तान परिसरात आवश्यक त्या सुविधा, सर्व कामांसाठी कोरोनाचा काळ अडीच वर्षाचा वगळता पुढील अडीच वर्षात सातत्याने पाठपुरावा करून अकोले तालुक्यासाठी 2500 कोटीचा निधी कामांसाठी खर्च झाला. उर्वरित कामे मंजूर असून आचारसंहिता संपल्यानंतर ते चालू होऊन पूर्ण होतील.
मुळा-आढळा धरणाचे पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने पाणी प्रश्न अत्यंत संगमाने हाताळला. तालुक्यात रस्ते, वीज पाणी या प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्व प्रश्न प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे मोडू शकलो. भविष्यात दूरदृष्टीने अनेक महत्वाचे पठार भागातील कामे पूर्ण करण्यासाठी व पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पशाच्या चिन्हावर बटन दाबून विक्रमी मताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी डॉक्टर किरण लहामटे यांनी केले. यावेळी सिताराम पाटील गायकर अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना मार्गी लागल्या मात्र पठार भागाला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे राज्याचे नेते नामदार अजितदादा पवार यांनी पिंपळगाव खांड धरण त्याचबरोबर निळवंडे धरण हे दोन्ही धरणे अग्रक्रमाने मंजूर केले. मुळा परिसरात पिंपळगाव खांड धरण पठार भागासह मुळा परिसराला वरदान ठरले आहे, मुख्य धरणात 24 टीएमसी पाणी वाहून जाते मात्र पठार भागाची गरज ओळखून अजितदादांच्या माध्यमातून एक टीएमसी पाणी अडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्याच्या मंत्रिमंडळात अजितदादांचा मोठा राजकीय दबदबा आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता आहे. शेतकर्यांना प्रत्येक प्रश्नांबाबत न्याय देण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे.