सद्स्यांच्या प्रगतीचा घेतला आढावा
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या आपल्या संगमनेर चॅप्टर ने ‘भिडे गप्पा ‘ या उपक्रमाचा शुभारंभ क्लबचे सदस्य व ओम साई हायड्रॉलिक्सचे संचालक निलेश रहाणे यांच्या कार्यालयाला भेट देऊन झाली .
2012 साली शेतकरी परिवारातील निलेश रहाणे यांनी कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना व्यवसाय सुरु केला. घरी जेसीबी फोकलँड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्राची निवड केली. हायड्रोलिक होज पाईप बनवण्यासाठी नाशिक पुणे या शहरांशिवाय पर्याय नसल्यामुळे आणि ग्राहकांची होणारी धावपळ बघून 2013 मध्ये सर्वप्रथम संगमनेरमध्ये हायड्रोलिक होजपाईप बनवायचे मशीन आणून सेवा चालू केली.
‘शेतकऱ्याच्या मुलांनी फार तर नोकरी करावी, व्यवसाय आपले काम नाही’ हा समज खोटा ठरवत त्यांनी सर्व ग्रामीण भागातील युवकांना एक नवी दिशा दाखवली. कमी बोलणं पण कामात तत्पर राहण्याच्या स्वभावामुळे हळूहळू व्यवसायात जम बसवला. सध्या JCB , पोकलेन ट्रॅक्टर व Earth Movers च्या मशिनरीचे स्पेअर्स पार्ट मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून ओम साई हायड्रोलिक्स नावारूपाला आले आहे. संगमनेरमधील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आर. एम. कातोरे, एन. के. गाडे, के. के. थोरात, एस. के. येवले, बी. एम. चाफळकर NACC निळवंडे, संगमनेर नगरपालिका, संगमनेर साखर कारखाना तसेच संगमनेर मधील सर्व विट उत्पादक त्यांचे ग्राहक आहेत. 2024 मध्ये त्यांनी ब्रेकर व ब्रेकरचे स्पेअर पार्ट चालू केले. मागील वर्षी Saturday Club Global Trust या व्यावसायिकांच्या संघटनेत सामील होत त्यांनी नेटवर्किंग सुरु केले. Formal business attire, business presentation, leads creation, done deals अशा सर्व गोष्टी अंगीकारत त्यांनी व्यवसायासोबतच व्यक्तिमत्वविकासावर काम सुरु केले. त्याचा परिणाम म्हणून अनेक नवनवीन संधी आज त्यांना खुणावत आहेत. संगमनेर, नाशिक-पुणे पासून अगदी बँगलोर, हैद्राबादच्या पलीकडे जात विदेशातील बाजारपेठेपर्यंत त्यांचे क्षितिज विस्तारले आहे. या सर्व आघाड्यांवर काम करतानाच त्यांनी आपली टीम वाढवली आहे. आपल्या लाईफ पार्टनरला व्यवसायात पार्टनर करीत त्यांनी शोभा मॅडमला सुद्धा एक नवीन फर्म आर. के. एंटरप्राइजेस या नावाने चालू केले. त्यांनाही अनेक business trainings आत्मसात करायला प्रोत्साहन दिले. भावी काळात त्यांच्या सर्व व्यावसायिक, वैयक्तिक, पारिवारिक, सामाजिक इच्छा अपेक्षा पूर्ण होवोत अशा सर्व संगमनेर Saturday Club Global Trust मेम्बर्सकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ. सागर गोपाळे
डेप्युटी रिजन हेड,
नगर रिजन, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, संगमनेर