संगमनेर बसस्थानकातून दोन महिलांचे साडेसोळा तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी

0
617

एकूण 3 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला

युवावार्ता (प्रतिनिधी) – संगमनेर – येथील बसस्थानक चोरट्यांचे जणू माहेरघर बनले आहे. राज कुठूनही येऊन कुणाच्याही गळ्यातून, पर्समधून दागिण्यांची, रोख रकमेची चोरी केली जात आहे. सोमवारी दुपारी या बसस्थानकात एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा उठवून अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या पर्समधून तब्बल साडेसोळा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. या जबरी चोरीने महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पहिली फिर्यादी लता शरद घुगे (वय 49, रा. सोनगाव, शिंगवे रोड, सायखेडा, ता. निफाड) या येथील बसस्थानकातून नाशिक एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा उठवून 35 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (70 हजार रुपये), 36 ग्रॅम वजनाची मोहन माळ (72 हजार रुपये), 6 ग्रॅमचे कानातले जोड (12 हजार रुपये), 1 ग्रॅम वजनाचे तीन ओमपान (6 हजार रुपये), 1 ग्रॅम वजनाचे बारिक रिंग दोन जोड (4 हजार रुपये), दोन ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या नथ (5 हजार रुपये), 3 ग्रॅम वजनाचे तीस मणी (6 हजार रुपये), दोन हजार रुपयांचि चांदीचे दागिने व दोन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी लता घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


दुसरी फिर्याद शुभांगी रविंद्र कासार (रा. खराडी, पुणे) या दुपारी 4 वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकातून पुणे येथे जाण्यासाठी एसटीबसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स लांबविली. या पर्समध्ये 1 लाख 20 रूपये किंमतीचे नविन बनावटीचे काळे मानी व 75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व त्यात सोन्याचे पेंडण, 15 हजार रूपये किंमतीचे 5 ग्रॅम काळे मनी असलेले मंगळसुत्र त्यात डायमंडचे खडे व पेंडण, 15 हाजार रूपये किंमतीची 5 ग्रॅम सोन्याची नथ, तीन हजार रूपये किंमतीच्या 500 रूपयाच्या 6 नोटा असा सुमारे 1 लाख 3 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटे घेऊन पसार झाले. दोन महिलांची पर्स एकाच दिवशी चोरट्यांनी बसस्थानकातून लंपास केली. आजच्या बाजारभावाप्रणाणे साडेसोळा तोळे सोन्यांची किंमत जवळपास 13 लाखांच्या पुढे आहे. मात्र पोलीसांनी दोन्ही मिळून 3 लाख 32 हजार रूपये धरली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here