संगमनेरमध्ये महायुतीच्या विजयाचा जल्लोश
संगमनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अनेक वर्षे यशस्वी मंत्रीपदे सांभाळलेले, सलग आठ वेळा विजयी झालेले बाळासाहेब थोरात यांचा या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. महायुतीचे नवखे उमेदवार असलेले अमोल खताळ यांनी त्यांचा 12000 मतांनी पराभव केला. बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने अनेक वर्षानंतर संगमनेरात विरोधी पक्षाचा झेंडा फडकला आहे. अमोल खताळ यांच्या विजयाची बातमी समजताच संपूर्ण तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश करत आमदार अमोल खताळ यांची भव्य मिरवणुक काढली. येथील भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली.
सुरूवातील पोस्टल मते मोजण्यात आली. या पोस्टल मतात महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आघाडी मिळाली. सकाळी 8.30 नंतर ईव्हीएम मशीन उघडल्यानंतर मतमोजणीच्या फेर्या सुरू झाल्या. पहिल्या फेरीपासून अमोल खताळ यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीत खताळ यांनी आपले मताधिक्य वाढवत नेले. संगमनेर शहरातील काही अपवाद वगळता तालुक्यातील ग्रामिण भागातील प्रत्येक मतदान केंद्रावर अमोल खताळ यांना मताधिक्य मिळाले आणि हे मताधिक्य शेवटपर्यंत टिकून राहिल्याने अमोल खताळ यांचा ऐतिहासिक विजय झाला. एकही निवडणुक न लढलेले परंतू संघटन कौशल्य आणि राजकारण आणि समाजकारणाची जाण असलेले अमोल खताळ यांनी राजकारणातील दिग्गज असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत जायंट किलर ठरले. विधासभेची निवडणुक जाहीर झाल्यानंतर संगमनेरातून डॉ. सुजय विखे हे उमेदवारी करण्यास इच्छुक होते परंतू धांदरफळ येथील घडलेली घटना व ही जागा शिंदे गटाला गेल्याने अमोल खताळ यांनी शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी मिळविली. त्यांच्या उमेदवारीला आणि त्यांच्या विजयासाठी सर्व रसद विखे परिवाराने दिली.
इकडे बाळासाहेब थोरात राज्यात नेतृत्व करत असताना त्यांनी संगमनेरची जबाबदारी कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्यावर सोपवली तर राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी त्यांनी शिर्डीत प्रभावती घोगरे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देत त्यांच्या विजयासाठी आपली संपूर्ण ताकद आणि यंत्रणा लावली. स्वत:सह ज्येष्ठ नेत्यांच्या सभा देखील शिर्डी मतदार संघात घेतल्या. संगमनेर मतदार संघाकडे झालेले दुर्लक्ष, त्यातच मतदारसंघात त्यांच्याबद्दल वाढलेली नाराजी, ठेकेदारांचे वर्चस्व, सामान्य नागरिकांना सहज न होणारी भेट, मतदारांना गृहित धरणे यासह अनेक गोष्टींचा फटका थोरातांना बसेल अशी शक्यता सुरूवातीपासून व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे अमोल खताळ यांनी नियोजनबध्द केलेला प्रचार, महायुतीच्या सर्व पक्षांना एकत्रित लावलेली ताकद, विखेंचे प्रचंड पाठबळ, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद, बटेंगे तो कटेंगेचा- एक है तो सेफ चा प्रभाव, नाराज तरूणाई या असंख्य घटकांमुळे अमोल खताळ यांचा ऐतिहासिक विजय झाला तर 40 वर्षांचा विजयी बुरूज यावेळी अनपेक्षितरित्या ढासळला. हा धक्का केवळ संगमनेरलाच नाही तर महाविकास आघाडीला तसेच काँग्रेस पक्षाला बसला आहे.
साहेबाचां झालेला पराभव हा आम्हा संगमनेरकरा ना मान्य नाही. EVM Machine मध्ये नकीच काही गडबड आहे. फेर निवडनुक व्हायला पाहिजेत, निवडणूक आयोग ला माझी विनंती आहे पुन्हा वोटिंग व्हायला पाहिजेत.
नगर मध्ये लंकेना आर्थिक किंवा अन्य ताकद देणे, शिर्डीत रसद आणि मानवी यंत्रणा पुरवणे, परिणामी मा खा.डॉ सुजय विखे इरेला पेटले आणि परिणाम आपल्या समोर आहे…
हा ईव्हीएम चा विजय आहे यामध्ये कितीही बीजेपी ने हिंदुत्वाचा नारा दिला असला तो फक्त दिखावा आहे जी गडबड केली आहे ती यांत्रिक आहे जे वर चढ नेतेअसतात ते बीजेपीला तहन होत नाही. म्हणून बीजेपी राष्ट्रीय स्तरावर देखील लोकनेत्यांचा पराभव कसा होईल व त्यांचे नेते मोदीच आहेत आणि ते लोकनेते आहेत असे भासवतात परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे क्रिमिनल माणसं कधीही लोकनेते बनू शकत नाहीत हे मुंबई मधल्या त्यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात सहभाग घेणे बंद केले व ईव्हीएम च्या साह्याने निवडणूक जिंकली हे सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे.